शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात साकारणार ‘गुगल’ची अद्ययावत प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:49 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बदलत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन व्यवहारांतील अनेक कामांसाठी या स्मार्टफोनवरील मोबाईल अ‍ॅपचा वापर वाढला आहे. या अ‍ॅपसह अँड्राईड प्रणालीबाबतचे नवनवीन संशोधन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात नववर्षात ‘गुगल’च्या सहकार्याने अद्ययावत प्रयोगशाळा साकारण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ आणि गुगलमध्ये जानेवारीमध्ये सहयोगी ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बदलत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन व्यवहारांतील अनेक कामांसाठी या स्मार्टफोनवरील मोबाईल अ‍ॅपचा वापर वाढला आहे. या अ‍ॅपसह अँड्राईड प्रणालीबाबतचे नवनवीन संशोधन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठात नववर्षात ‘गुगल’च्या सहकार्याने अद्ययावत प्रयोगशाळा साकारण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ आणि गुगलमध्ये जानेवारीमध्ये सहयोगी करार होणार आहे.इंटरनेटशी निगडित सेवा, उत्पादने आणि तंत्रज्ञान पुरविणाºया ‘गुगल’ या कंपनीसमवेतच्या कराराचा मुख्य उद्देश हा संगणक शास्त्राच्या प्राध्यापकांना मोबाईल अ‍ॅप, नेव्हिगेशन, अँड्राईड प्रणाली, आदी सुविधांबाबतचे तंत्रज्ञान, संशोधनाबाबत प्रशिक्षण देणे. या प्राध्यापकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक गुगलच्या उत्पादनांबाबत प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविणे असा आहे. या कराराच्या अनुषंगाने आॅक्टोबर २०१७ पासून विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. त्यात गुगलने विद्याशाखा विकास कार्यक्रमांची व्यवस्था केली आहे.विद्यापीठातील संगणकशास्त्र अधिविभागाने प्रा. डॉ. आर. के. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांसाठी गुगल पुरस्कृत ‘अँड्राईड फंडामेंटल डेव्हलपमेंट’ या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा दोनवेळा घेतली आहे. त्यामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांनी शंभर प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले आहे.विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाने ‘मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स्’मध्ये अँड्राईड प्रणालीच्या मूलभूत घटकांबाबतचा ६० तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याची सुरुवात विद्यापीठाच्या यावर्षीच्या दुसºया सत्रापासून झाली असून यासाठी ६० विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.या अभ्यासक्रमासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्स्, पुस्तके असे विविध शैक्षणिक साहित्य ‘गुगल’ने उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून विद्यापीठातील संगणक शास्त्रातील डॉ. कविता ओझा काम पाहत आहेत.करारातील पुढील टप्प्यात विद्यापीठात अँड्राईड प्रणालीबाबतच्यानवनवीन संशोधनासाठी अद्यावत प्रयोगशाळा साकारण्यात येणार आहे. त्यासह विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागामधील १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.विद्यापीठाच्या ‘ग्लोबल भरारी’ला बळविविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ ग्लोबल भरारी घेत आहे. त्याला ‘गुगल’समवेतच्या या सहयोगी करारामुळे आणखी बळ मिळणार असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, अँड्राईड प्रणाली, मोबाईल अ‍ॅपसह संगणकशास्त्रातील संशोधनाबाबत गुगलने ग्रामीण भागातील आपल्या विद्यापीठाबरोबर काम करण्याचा देशातील पहिलाच उपक्रम आहे. विद्यापीठाने संगणकशास्त्र आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच ‘गुगल’ने या उपक्रमासाठी निवड केली आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान मिळणार आहे. संगणक शास्त्रामध्ये जगाच्या नकाशावर काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांमधील रोजगार क्षमता वाढणार आहे.अ‍ॅप, वेब डेव्हलपर क्षेत्रात रोजगाराची संधीमोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अँड्राईड प्रणालीस अनुसरून मोबाईल अ‍ॅप बनविण्याच्या क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत, असे संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘गुगल’ने भारतामध्ये तीन लाख गुगल अँड्रॉईड डेव्हलपर तयार करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. विद्यापीठासमवेत गुगलच्या होणाºया सहयोगी करारामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णांतील युवक-युवतींना अ‍ॅप डेव्हलपर, वेब डेव्हलपर या क्षेत्रात रोजगाराची संधी मिळणार आहे. जानेवारीच्या दुसºया आठवड्यापर्यंत हा सहयोगी करार होईल.