शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

CoronaVirus Kolhapur : कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 19:25 IST

CoronaVirus Kolhapur : कडकडीत लॉकडाऊनच्या सलग दुसऱ्यादिवशी सोमवारी कोल्हापूर शहर शंभर टक्के बंद राहिले. कोरोना साखळी तोडण्याचा कोल्हापूरकरांनी निर्धार केला असल्याचे मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. कोणीही नागरिक विनाकारण रस्त्यावर आले नाहीत, तर आपल्यातील जागरुकपणाचे दर्शन घडवित, त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत प्रशासनाच्या प्रयत्नांना मदत केली.

ठळक मुद्देकोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद भाजी मंडईत सोमवारी नीरव शांतता

कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या सलग दुसऱ्यादिवशी सोमवारी कोल्हापूर शहर शंभर टक्के बंद राहिले. कोरोना साखळी तोडण्याचा कोल्हापूरकरांनी निर्धार केला असल्याचे मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. कोणीही नागरिक विनाकारण रस्त्यावर आले नाहीत, तर आपल्यातील जागरुकपणाचे दर्शन घडवित, त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत प्रशासनाच्या प्रयत्नांना मदत केली.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विस्फोट झाला असून संसर्गाची साखळी तोडण्याकरिता कडकडीत लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नव्हता. दोन-तीन दिवस आधी जिल्हा प्रशासन असो, की पालकमंत्री सतेज पाटील, की ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ असोत, सर्वांनीच जिल्ह्यातील नागरिकांना कडकडीत लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे जरुरीचे साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेऊन ठेवणे शक्य झाले होते.सोमवारचा दिवस म्हणजे आठवड्याची सुरुवात असते, रस्त्यावर सर्वत्र वर्दळ, नागरिकांची रस्त्यावरील गर्दी, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, न्यायालये, खासगी आस्थापनांची कार्यालये फुल्ल झालेली असतात. परंतु कालचा सोमवार त्याला अपवाद ठरला. रस्त्यावर, तसेच सरकारी कार्यालयात असे चित्र कोठेच दिसले नाही. एरव्ही भाजी मंडईत झुंबड उडालेली असायची, गोंगाट असायचा. मात्र तेथेही सोमवारी नीरव शांतता होती. पोत्यांनी झाकलेल्या बुट्ट्‌या, त्यावर प्लास्टिकचे कागद आणि दगड ठेवलेले चित्र पाहायला मिळाले.शहरातील सर्व प्रकारची दुकाने बंद होती. रस्त्यावरील फेरीवाले गायब होते. कोठेही कोणीही चोरून बसून सुध्दा भाजी विक्रीचा प्रयत्न केला नाही. चहाची टपरी नाही की पानाची टपरी सुध्दा कुठे उघडल्याचे दिसले नाही. रस्त्यावर केवळ सरकारी कार्यालयांत, रुग्णालयांत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच काय ती तुरळक वर्दळ होती. बाकी सर्वसामान्य नागरिक कुठेही दिसला नाही. पेट्रोलपंप सुरू होते, परंतु तेथे केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच पेट्रोल देण्याचे बंधन असल्याने त्याठिकाणीही सामसूम होती. दोन दिवसापासून पंप चालकांच्या विक्रीत प्रचंड घट आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर