शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला...

By admin | Updated: March 16, 2016 23:55 IST

काळ आला होता पण... : मुरगूड एस. टी. स्टॅण्डवरील चित्तथरारक घटना

अनिल पाटील -- मुरगूड--वेळ दुपारी साडेतीनची. ठिकाण मुरगूड (ता. कागल) मधील एस. टी. स्टॅण्ड. मंगळवार आठवडा बाजाराचा दिवस, त्यामुळेच स्टॅण्ड परिसरात गर्दी. त्यातीलच एक अपंग एस.टी.ची वाट पाहत उभा. गाडी फलाटवर लावताना तो चालकाला दिसला नाही, त्याला जोराची धडक बसली. तो खाली कोसळला; पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणूनच वाचला. नियतीचा आगळावेगळा खेळ शेकडो डोळ्यांनी पाहिला.घडले ते असे. मुरगूडच्या एस. टी. स्टॅण्डवर बाजार असल्याने प्रवाशांची गर्दी होती. कोल्हापूर जलद गाडी आपल्या फलाटावर लावण्यासाठी चालक व वाहक दोघेही प्रयत्न करीत होते. बसमध्ये पुढच्या सीटवर बसूनच शिट्टी वाजवून वाहक चालकाला इशारा देत होता. नेमक्या त्याच गाडीच्या मागे बाजारासाठी आलेला एक अपंग प्रवासी एस. टी.ची वाट पाहत उभा होता. त्याचे लक्ष आपल्या दिशेने येणाऱ्या एस.टी.कडे अजितबात नव्हते, तसेच चालक आणि वाहकालाही तो दिसत नव्हता. त्यामुळे एस.टी.ची मागून त्या अपंग व्यक्तीला जोराची धडक बसली आणि तो खाली कोसळला. एस. टी. पूर्णपणे त्याच्या अंगावरून फलाटावर गेली होती. सुदैवाने तो कोसळल्यानंतर कोणतीही हालचाल न करता निपचिप पडून राहिल्याने त्याच्या अंगावरून चाक गेले नाही, तोपर्यंत बाजूस असणाऱ्या प्रवाशाने माणूस गावला...ऽऽ एस.टी. खाली माणूस गावला...ऽऽ अशी आरोळी ठोकली. त्यामुळे त्या एस.टी.च्या सभोवताली शेकडो लोक जमले. एव्हाना आपल्या हातून मोठी चूक झाली आहे याची कल्पना चालक आणि वाहकाला आल्याने ते पूर्णपणे बिथरले; पण उपस्थित स्टॅण्ड नियंत्रकाने बस पुढे घेण्यास सांगितले. त्यानंतर खाली निपचिप पडलेल्या त्या व्यक्तीकडे साऱ्या नजरा गेल्या. त्याची कोणतीच हालचाल नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला असावा, असा अंदाज काढून कोणीतरी रुग्णवाहिकेला फोनही केला, पण इतक्यात घाबरून निपचिप पडलेल्या त्या व्यक्तीने डोळे उघडून सर्वांवर नजर फिरविली आणि आपल्याला काही इजा झालेली नाही, असे सांगून आपल्याला उठण्यासाठी मदत करा, असे आवाहनही केले.चालक आणि वाहक नियंत्रण कक्षामध्ये अक्षरश: भीतीने थरथरत होते; पण जेव्हा त्यांना समजले की त्या व्यक्तीला कोणतीच इजा झाली नाही तेव्हा कोठे त्या दोघांबरोबर एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हळूहळू गर्दी पांगत होती. कोण म्हणत होता, त्याची वेळच चांगली, तर कोण म्हणत होता, ‘नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला’.