शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

अंबेच्या जयघोषात सुवर्णपालखी अर्पण

By admin | Updated: May 3, 2017 00:52 IST

अंबाबाई मंदिराला नवी झळाळी : नेत्रदीपक सोहळा आणि महाआरतीसाठी भाविकांची अलोट गर्दी

कोल्हापूर : सप्तरंगी फुलांची आरास, इंद्रधनुषी विद्युत रोषणाईने झळाळून निघालेले मंदिर, मराठमोळ्या वाद्यांना लाभलेली दाक्षिणात्य संगीताची साथ, पवित्रानुभूती देणारे मंत्रोच्चार, तीन पीठाधीशांचे आशीर्वचन, ‘अंबामाता की जय!’चा गजर, अखंड पुष्पवर्षाव आणि महाआरतीने आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला सोमवारी (दि. १) सुवर्णपालखी अर्पण करण्यात आली. तब्बल २६ किलो सुवर्णपालखीेचा अर्पण सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. दोन वर्षांपूर्वी संकल्पित करण्यात आलेल्या या सुवर्णपालखीला देवीचरणी अर्पण करण्यासाठी सुरू असलेल्या जय्यत तयारीने सोमवारी अंतिम रूप घेतले. धार्मिक आणि ऐतिहासिक अधिष्ठान लाभलेल्या भवानी मंडपात साकारलेल्या आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या रंगमंचावर हा सोहळा साकारला. कांचीपुरम् येथील श्री कांची कामकोटी पीठाचे पीठाधीश जयेंद्र सरस्वती स्वामीजी, करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री विद्यानृसिंह भारती, राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश परमपूज्य सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार, अरुंधती महाडिक, भरत ओसवाल उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पीठाधीशांच्या हस्ते सुवर्णपालखी व दस्तऐवज देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. एकीकडे राज्यातील सर्वांत मोठा ३०३ फुटी ध्वजस्तंभ उभारला गेला; तर दुसरीकडे सुवर्णपालखी देवीला अर्पण करण्यात आली. प्रत्येक चांगल्या कामातच लोकसहभाग आवश्यक असतो. कोल्हापूर हे समृद्ध शहर आहे. आता आपल्याला घेण्याची नाही, तर समाजाला काही देण्याची सवय लावून घेतली पाहिजे. ईश्वरभक्तीत आमच्या भावना गुंतल्या आहेत. संकल्पपूर्तीसाठी आलेल्या अडचणींवर मात करीत साकारलेली ही सुवर्णपालखी म्हणजे देवीला वाहिलेली श्रद्धा आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, लोकसहभागातून महाराष्ट्रातील एखाद्या देवस्थानासाठी साकारण्यात आलेली ही पहिली सुवर्णपालखी आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. या सगळ्यांमुळे कोल्हापूरची पर्यटनवृद्धी होईल. राघवेंद्र स्वामी पीठाचे पीठाधीश स्वामी सुबुधेंद्रतीर्थ म्हणाले, देवाने आपल्याला दिलेली संपत्ती सार्थ ठरण्यासाठी ती देवालाही समर्पित करावी. जगदंबेला अर्पण करण्यात आलेली ही पालखी म्हणजे ऐतिहासिक घटना आहे. करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती म्हणाले, अंबाबाई आणि शंकराचार्य, शंकराचार्य आणि छत्रपती घराणे यांचा पुरातन संबंध आहे. कोल्हापूरकरांनी करवीर पीठात यावे. कांचीपुरम् पीठाचे पीठाधीश जयेंद्र सरस्वती स्वामीजी यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या परंपरांचा अभिमान बाळगावा, त्यांचा गौरव करावा, गुरूंचा आशीर्वाद घ्यायला हवा, असे प्रतिपादन केले. शाहू छत्रपती व महापौर हसिना फरास यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. भरत ओसवाल यांनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी सुवर्णपालखी साकारलेले हे पहिले पीठ आहे, असे नमूद केले. यावेळी पालखीचे कारागीर गणेश चव्हाण, देवीचंद ओसवाल, केतन शहा यांच्यासह प्रमुख देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. वेदमूर्ती सुहास जोशी यांनी धार्मिक विधी केले. प्रसन्न मालेकर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता खाडे यांनी आभार मानले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजी जाधव, सुवर्णपालखी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. पालखी ट्रस्टचे विश्वस्त शिवप्रसाद पाटील यांच्या ब्लू बॉक्स इव्हेंट या संस्थेच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरेख व्यासपीठ, थेट प्रक्षेपण, फुलांची आरास असे सुरेख नियोजन करण्यात आले होते. त्यांना अमर पाटील यांचे सहकार्य लाभले. नवरात्रौत्सवाचा अनुभव या सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या मंगलमयी वातावरणाने आणि भाविकांच्या अलोट गर्दीने नवरात्रौत्सवाची आठवण झाली. या सोहळ्यानंतर पालखी गरुड मंडपात भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आली. त्यानंतर सुवासिनींच्या हस्ते महाआरती करून सोहळ्याची सांगता झाली.महाडिक केंद्रीय मंत्री होतीलभाषणाच्या सुरुवातीलच चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मी खासदार महाडिक यांना विचारले की, तुम्ही सुवर्णपालखीचा निर्णय कसा घेतलात? देवीला काही नवस बोलला होतात का? यावर महाडिक म्हणाले, देवीने मला सगळं दिले आहे. नवस कशाला बोलू? पण अजूनही त्यांना सगळे मिळालेले नाही. केंद्रीय मंत्रिपद मिळायचे बाकी आहे. त्यांची ही इच्छासुद्धा अंबाबाई पूर्ण करील. आता ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत; २०१९ नंतर त्यांची ही इच्छा पूर्ण होईल.