शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जयश्री बोरगी, मंदार दिवसे यांची सुवर्णमयी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 17:56 IST

कोल्हापूर : अमेरिकेत सुरु असलेल्या विश्व पोलीस - फायर खेळ स्पर्धेत कोल्हापूरच्या जयश्री बोरगी हिने धावणे स्पर्धेत तीन सुवर्ण , तर मंदार दिवसे यांने जलतरण स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य पदक पटकाविले. त्यामुळे सातासमुद्रापार पुन्हा एकदा कोल्हापूरकरांनी बाजी मारली.

ठळक मुद्देविश्व पोलीस-फायर खेळ स्पर्धामहाराष्ट्राच्या खेळाडूंचा स्पर्धेत वरचष्मासांघिक गटात रौप्य पदकाची कमाई

कोल्हापूर : अमेरिकेत सुरु असलेल्या विश्व पोलीस - फायर खेळ स्पर्धेत कोल्हापूरच्या जयश्री बोरगी हिने धावणे स्पर्धेत तीन सुवर्ण , तर मंदार दिवसे यांने जलतरण स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य पदक पटकाविले. त्यामुळे सातासमुद्रापार पुन्हा एकदा कोल्हापूरकरांनी बाजी मारली.

लॉस एन्जेलिस येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत काल (बुधवारी) जयश्री बोरगी हिने ५ किलोमीटर चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यात भर घालत गुरुवारी मध्यरात्री झालेल्या १५०० व ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये जयश्रीने पुन्हा सुवर्णमय कामगिरी करीत आणखी दोन सुवर्णपदके पटकाविली. त्यामुळे तिच्या खात्यात एकूण ३ सुवर्ण पदके झाली आहेत.

यासह कोल्हापूरचाच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व सीमा सुरक्षा दलात अधिकारी असणारा मंदार दिवसे याने उदघाटनादिवशी झालेल्या खुल्या जलतरण स्पर्धेत एक , तर ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये एक सुवर्ण अशी दोन सुवर्ण पदके व ५० बाय ४ रिले मध्ये सांघिक गटात एक रौप्य पदकाची कमाई केली.

मुंबई पोलीस दलाची सोनिया मोकल हिने याच प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. तर पुणे पोलिस दलाच्या रविंद्र जगतापने फ्रीस्टाईल ७० किलोगटात सुवर्ण पदक पटकाविले. त्यामुळे एकूणच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा या स्पर्धेत वरचष्मा राहीला.