शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

कोल्हापूरसाठी सुवर्ण क्लस्टर आवश्यक

By admin | Updated: September 4, 2016 01:22 IST

जी. व्ही. श्रीधर : कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, शासकीय तंत्रनिकेतन व धातुतंत्र प्रबोधिनीमध्ये सामंजस्य करार

कोल्हापूर : कोल्हापूरला दागिन्यांची परंपरा पूर्वांपार आहे. कोल्हापुरी साज आणि हुपरीचे दागिने अधिक लोकप्रिय होण्यासाठी कोल्हापूरला सुवर्ण क्लस्टर होणे गरजेचे आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष जी. व्ही. श्रीधर यांनी शनिवारी येथे केले.कोल्हापूर जिल्हा सराफ संघ, शासकीय तंत्रनिकेतन व धातुतंत्र प्रबोधिनी यांच्यामधील सामंजस्य करारावेळी ते बोलत होते. हे क्लस्टर मंजूर झाले तर त्याच्या विकासासाठी फेडरेशन सर्व ती मदत करील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुवर्ण कारागिरांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत असून, याअंतर्गत तीन ते सहा महिन्यांचे दहा अभ्यासक्रम येथे शिकविण्यात येणार आहेत. खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरच्या दागिन्यांची ओळख सर्वदूर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना पारंपरिक कारागिरांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक असून ही गरज या प्रशिक्षणातून पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला चप्पल क्लस्टर झाले नाही, ही आपल्यासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे नमूद करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी जी मोहीम सुरू केली आहे, तिचा फायदा या कारागिरांना व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अशोक गडहिरे, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश मेहता, जेम्स अँड ज्वेलरीचे विभागीय अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनीही मार्गदर्शन केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल यांनी प्रास्ताविकात सराफ व्यवसायाचा आढावा घेताना कोल्हापूर जिल्ह्यातील सुवर्ण कामगारांना या प्रशिक्षणाची मोठी संधी मिळत असल्याचे स्पष्ट केले. शशांक मांडरे यांनी धातुतंत्र प्रबोधिनीसंदर्भात माहिती दिली. शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी आभार मानले.यावेळी धातुतंत्र प्रबोधिनी नियामक समितीचे अध्यक्ष, उद्योगपती किरण पाटील, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे विश्वस्त संजय जैन, नितीन कदम, प्रफुल्ल राणावत, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, कुलदीप गायकवाड, जितेंद्रकुमार राठोड, सुहास जाधव, सतीश भोजे, दिनकर ससे, बाबूराव जाधव, सुरेश पाटील, शीतल पोतदार, दीपक वेर्णेकर, तेजपाल शहा, अमर दड्डी, स्वप्निल शहा, गजानन बिल्ले, महेश जोके, सुनील मंत्री, अशोक झाड, राजू चोपडे यांच्यासह शहर-जिल्हा संघाचे पदाधिकारी व सराफ व्यावसायिक, कारागीर उपस्थित होते. (प्रतिनिधी)सभागृहात हशा : सोनं अंगावरलं अन् पेटीतलंकार्यक्रमामध्ये संभाजीराजे यांनी भरत ओसवाल, धनंजय महाडिक यांच्याकडे आहे, तसा पैसा माझ्याकडे नाही, असे वक्तव्य केले. लग्नाला २0 वर्षे झाली, तेव्हा जुन्या दागिन्यांवर काम करण्यासाठी बंगालहून कारागीर आणावे लागले, अशीही माहिती दिली. हाच धागा पकडून महाडिक म्हणाले की, मघाशी राजेंनी बोलताना चेष्टा केली. मात्र, आमच्याकडे अंगावर आहे तेवढंच सोनं आहे. राजे, तुमचं सोनं पेटीमध्ये आहे, असे महाडिक म्हणताच सभागृहात हशा पिकला.