शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बाजार कर घोटाळाप्रकरणी कारवाई गुल - इचलकरंजी नगरपालिका : अहवाल मिळूनही निर्णय प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:08 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते.

राजाराम पाटील ।इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील बाजार कर विभागाकडे वसुलीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असल्याच्या कारणावरून चौकशीसाठी पथक नेमले होते. पथकाचा अहवाल महिन्यापूर्वी सादर झाला असतानाही त्याचे निष्कर्ष आणि कारवाई गुलदस्त्यातच राहिल्याने नगरपालिका क्षेत्रात हा विषय चर्चेचा ठरला आहे.

आॅक्टोबर महिन्याच्या तिसºया आठवड्यात दीपावली सण झाल्यानंतर नगरपालिकेकडे वसूल होणारा बाजार कर घटल्याची माहिती उजेडात आली. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी बाजार कराबाबत प्राथमिक चौकशी केली असता कर वसुलीमध्ये काही गैरव्यवहार होत असल्याचा संशय आला. म्हणून मुख्याधिकाºयांनी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांच्या नियंत्रणाखाली सहाजणांचे चौकशी पथक नेमले.

चौकशी पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर बसणारे फळ विक्रेते, फेरीवाले, तसेच अनेक प्रकारच्या विविध वस्तंूची विक्री करणाºया किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली. त्याचबरोबर मंगळवारी व शुक्रवारी थोरात चौक, विकली मार्केट, विक्रमनगर, अण्णा रामगोंडा शाळा, डेक्कन चौक, जय सांगली नाका व शहापूर याठिकाणी भरणारे आठवडी बाजार येथेही प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

या चौकशीत आणि पाहणीमध्ये काही किरकोळ विक्रेते, फेरीवाले व हातगाडीवरून विक्री करणारे यांच्याकडे गेल्या काही वर्षांत कर वसुलीची पावती झालीच नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर काही ठिकाणी बाजार करासाठी आवश्यक असलेले पैसे घेऊनसुद्धा पावती दिली नाही किंवा कमी रकमेची पावती दिली, असेही अनेक प्रकार उघडकीस आले.

अशा प्रकारे बाजार कर चौकशीसाठी नेमलेल्या पथकाकडून डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष केलेले सहा वेगवेगळे अहवाल अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. अतिरिक्त मुख्याधिकाºयांनी या अहवालावर अभ्यास करून त्याबाबत सारांशाने निष्कर्ष काढणारा अहवाल मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे सादर केला. सदरचा अहवाल सादर करून साधारणत: महिना लोटला आहे. मात्र, त्याबाबतचे अंतिम निष्कर्ष व कारवाई अद्यापही प्रलंबित आहे.काही फेरीवाल्यांकडे  गेली अनेक वर्षे पावतीच नाहीचौकशी पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी केली असता थोरात चौकातील खाद्यपदार्थ विक्री करणाºया एका विक्रेत्याकडे गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ कर वसुलीची पावतीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच गेल्या दिवाळीमध्ये मंदीच्या कारणावरून बाजारामध्ये विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी कमी झाली होती. त्याचा परिणाम दिवाळीच्या बाजारावर झाला आणि कर वसुलीमध्ये आवश्यकतेपेक्षा जादा घट दाखविण्यात आली, असेही काही जाणकारांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :MarketबाजारTaxकर