शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

कोल्हापुरात गुळाचे सौदे निघाले, दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:36 IST

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत ...

कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली दरवाढीच्या वादामुळे शनिवार (दि. १६)पासून खोळंबलेले गुळाचे सौदे बुधवारी सकाळी पूर्ववत झाले; पण दरात मात्र क्विंटलमागे २०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. अडते, हमालांच्या वादात गूळ उत्पादक शेतकरी मात्र भरडला गेला असून, त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.अडत्यांकडून १० टक्के हमाली दरवाढीच्या मागणीसाठी गेल्या शनिवारपासून बाजार समितीत आंदोलन सुरू आहे. शनिवारी सकाळी सौदा निघाला तरी ३६ हजार रवे शिलाई न केल्याने तसेच पडून राहिले. रविवार (दि. १७) च्या बैठकीत तोडगा निघाला असे गृहीत धरून सोमवारी (दि. १८) आणखी तीन हजार गूळ रव्यांची बाजारात आवक झाली; पण हमाल आणि अडत्यांच्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याने सोमवारी सौदेच निघाले नाहीत. मंगळवारीही (दि. १९) गुंता कायम राहिल्याने सौद्यासाठी माल आलाच नाही.मंगळवारी रात्री तोडगा निघाल्याने बुधवारी सकाळी सौदे पूर्ववत झाले. ९०६९ गूळरव्यांची नव्याने आवक झाली; तर शनिवार ते सोमवार या कालावधीत समितीत आलेल्या १०२९३ गूळरव्यांची विक्री झाली. अजूनही १८ हजार ३८६ रवे शिल्लक असून, त्यांचा सौदा आज, गुरुवारी होणार आहे.दरम्यान, सौदे पूर्ववत झाले पण दरात मात्र घसरण झाली आहे. सरासरी दर ३४०० ते ३५०० रुपये असा स्थिर राहिला असला तरी सर्वांत कमी प्रतीच्या गुळाचा दर २०० रुपयांनी कमी होऊन तो २८०० रुपये क्विंटलवर आला आहे. शनिवारी हाच दर ३००० ते ३१०० रुपये होता. हीच परिस्थिती एक नंबरच्या गुळाची आहे. शनिवारी सरासरी ४५०० ते ४८०० रुपये असणारा दर आता ३६०० ते ४१०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. कमाल दरात ४०० ते ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. एक किलो गुळाचे ९२०० बॉक्स सौद्याला होते. त्याच्याही दरात १०० रुपयांची घसरण झाली.गुळाच्या दर्जानुसार रोजचे दर बदलत असतात; पण हंगाम सुरू झाल्यापासून सातत्याने ४००० रुपये क्विंटलच्या वर असणारे दर आता मात्र त्याच्याही खाली आल्याने गूळ उत्पादकांची अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे. अडते आणि हमालांच्या वादात शेतकरी नाहक भरडला गेल्याने आता गुळ उत्पादकामधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, बाजार समितीचे बोटचेपे धोरणच याला कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावरचार दिवसांनंतर सौदे सुरू झाल्यामुळे आनंद वाटला; पण प्रत्यक्षात सौदे सुरू झाल्यानंतर अडते, व्यापाऱ्यांकडून लूटच सुरू झाली. जो गूळ शनिवारी किमान ३६०० रुपये क्विंटलने विकला गेला होता, तोच गूळ आता ३१०० ते ३२०० रुपयांना द्यावा लागला. मुळातच ३८०० ते ३९०० रुपये किमान भाव मिळाला तर ‘ना नफा - ना तोटा’ या तत्त्वावर गुºहाळघर चालविता येते. आता त्याच्याही खाली दर आल्याने गूळ उत्पादक शेतकरी अक्षरश: रस्त्यावर आला आहे.- राजू पाटील,गूळ उत्पादक, निगवे, ता. करवीर