शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk : नव्या पॅकिंग करारातून गोकूळचे २ कोटी वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 12:06 IST

Gokul Milk : मुंबईत दूध वितरण करण्यासाठी रोज कराव्या लागणाऱ्या ३ लाख लिटर दूधाच्या पॅकिंगचा नव्या करारामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकूळ) एका वर्षासाठी तब्बल २ कोटी ८ लाख रुपये वाचले आहेत. गुरुवारी महानंद या सरकारी डेअरीसोबत नवा करार झाला. गोकूळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्याने ही बचत झाली आहे.

ठळक मुद्देसत्तांतरानंतरची बचत खासगीऐवजी महानंदच करून देणार पॅकिंग

कोल्हापूर : मुंबईत दूध वितरण करण्यासाठी रोज कराव्या लागणाऱ्या ३ लाख लिटर दूधाच्या पॅकिंगचा नव्या करारामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकूळ) एका वर्षासाठी तब्बल २ कोटी ८ लाख रुपये वाचले आहेत. गुरुवारी महानंद या सरकारी डेअरीसोबत नवा करार झाला. गोकूळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्याने ही बचत झाली आहे.

यावेळी दूग्धविकास मंत्री सुनील केदार, महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख, गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या उपस्थितीत हा करार झाला. या निर्णयामुळे गोकूळचा अनावश्यक खर्चाला लगाम बसलाच, परंतू महानंद या सरकारी डेअरीला ही उत्पन्नाचे नवे साधन मिळाले. दुग्धव्यवसायच्या वाढीच्या उद्देशाने गोकूळ व महानंद यापुढे भविष्यात एकत्रित काम करणार, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. विविध प्रकारची बचत करून दूध उत्पादकांस जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.मुंबईत गोकूळची रोजची सरासरी प्रतिदिन दूध विक्री ८ लाख लिटर असून संघाच्या वाशी येथील डेअरीमधून प्रतिदिन ५ लाख लिटर पॅकिंग होते. ३ लाख लिटर पॅकिंग हे इग्लू डेअरी सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडून सध्‍या प्रतिलिटर १ रुपये ६० पैसे या दराने करून घेतले जात होते. या कराराची मुदत ३१ मे २०२१ पर्यंत होती. करार नूतनीकरण करताना त्‍यांनी ९ टक्‍के (प्रतिलिटर ०.१४ पैसे) दरवाढीची मागणी केली.

ही दरवाढ अवास्‍तव असूनही ते ती कमी करायला तयार नव्हते. ही बाब मंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यामध्ये महानंदकडे पॅकिंग होऊ शकते, त्यांच्याकडे ती सोय उपलब्ध असल्याचे लक्षात आले. त्यानुसार दूग्धविकास मंत्री केदार व महानंदचे अध्यक्ष देशमुख यांच्याशी चर्चा करून पॅकिंगचा करार निश्चित केला.

गुरुवारी दुग्धविकास मंत्री केदार यांच्‍या दालनामध्‍ये करारपत्रावर स्वाक्षरी झाल्‍या. यावेळी महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, कार्यकारी संचालक श्‍यामसुंदर पाटील, गोकूळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर तसेच दोन्ही संघांचे अधिकारी उपस्थितीत होते.खर्च तरीही बचतचइग्लू या खासगी कंपनीकडून गोकूळ गेली तीस वर्षे दूधाचे पॅकिंग करून घेत होता. परंतू आतापर्यंत महानंदच्या पर्यायावर कधीच विचार झाला नाही. गोकूळची मुंबईतील डेअरी वाशीला आहे व इग्लूचे पॅकिंग व्यवस्थाही वाशीमध्येच आहे. महानंदला दूध पॅकिंगसाठी पाठवायचे झाल्यास गोरेगावला ३० किलोमीटरवर पाठवावे लागेल. त्यासाठी लिटरला ५ पैसे खर्च झाले तरी लिटरमागे १४ पैसे वाचले आहेत.करार असा झाला..

  • गोकूळचे प्रतिदिन मुंबईतील पॅकिंग : ७ लाख लिटर
  • गोकूळची स्वत:ची पॅकिंग व्यवस्था : ५ लाख लिटर
  • खासगी कंपनीचा सध्याचा दर : प्रतिलिटर १.६० पैसे
  • खासगी कंपनीची नव्या वाढीव दराची मागणी : प्रतिलिटर ०.१४ पैसे
  • महानंदचा पॅकिंगचा दर : प्रतिलिटर १.५५ पैसे.
  • नव्या करारानुसार प्रतिलिटर वाचलेली रक्कम : ००.१९

गोकूळची सत्तांतरानंतरची बचत१. अतिरिक्त रोजंदारी नोकर कपात ३ कोटी १२ लाख२. टँकर वा‍हतूक ०.१७ पैसे कपातीमुळे ५ कोटी ३२ लाख३. मुंबईतील पॅकिंग खर्चात बचतीमुळे २ कोटी ८ लाख 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर