शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या सभेचा निर्णय सहकार न्यायालयातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:49 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेबाबत सहायक निबंधक (दुग्ध) यांनी विभागीय उपनिबंधकांकडे पाठविला आहे.

ठळक मुद्देविषयांना विश्वास पाटील यांनीच मंजुरी दिल्याचा अहवाल इतर मुद्द्यांवर शिरापूरकर निर्णय देणार

लोकमत न्यूजनेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेबाबत सहायक निबंधक (दुग्ध) यांनी विभागीय उपनिबंधकांकडे पाठविला आहे. त्यामध्ये संघाच्या प्रोसेडिंगमध्ये विषयांचे वाचन विश्वास पाटील यांनीच केल्याचे म्हटले आहे. सहकार ‘कलम ९२’नुसार सभेच्या संचलनाबाबतचा निर्णय सहकार न्यायालयच घेऊ शकते. त्यामुळे सभेचे भवितव्य आता न्यायालयात ठरणार आहे. उर्वरित तक्रारींतील मुद्द्यांबाबत विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर निर्णय घेणार आहेत.

‘गोकुळ’च्या सभेबाबत आमदार सतेज पाटील यांच्यासह काही दूध संस्थांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. संघाच्या पोटनियमाला धरून सभेचा कामकाज झाले नसल्याने सभा पुन्हा घेण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी सभेच्या कामकाजाची चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. सहायक निबंधक (दुग्ध) अरुण चौगले यांनी चौकशी करून अहवाल सुनील शिरापूरकर यांच्याकडे पाठविला आहे.

चौकशीमध्ये एकूण आठ वेगवेगळे मुद्दे आहेत. सर्वसाधारण सभा नोटीस, सभेचे प्रत्यक्ष कामकाज याबाबतचा अहवाल त्यांनी दिला आहे. संघ व्यवस्थापनाने लिहिलेले प्रोसेडिंगनुसार विषयपत्रिकेचे वाचन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. इतर मुद्द्यांबाबत ही त्यांनी अहवाल दिला असून त्याचा अभ्यास करून शिरापूरकर अंतिम निकाल देणार आहेत. आठपैकी सभेचे संचलन कसे झाले याबाबत ‘कलम ९१’नुसार सहकार न्यायालयात दाद मागावी लागते. उर्वरित मुद्द्यांबाबत उपनिबंधक निर्णय देणार आहेत.एका सभेचे कामकाज चार कलमानुसारसभेची नोटीस कधी, कशी काढली याबाबत सहकार कलम ७५ (१ ते ४) मध्ये मार्गदर्शन दिले आहे. कलम ६० (३) मध्ये सभेतील विषय कसे हाताळावेत हे सांगितले आहे. या दोन्ही कलमांनुसार जर सभा झाली नाही तर कलम ७५(५)नुसार कारवाई करण्याचे अधिकारी निबंधकांना आहेत. सभेचे संचलन कसे झाले. याबाबत ‘कलम ९१’मध्ये मार्गदर्शन केले आहे.