शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’चे सव्वा तीन कोटींचे नुकसान-सतेज पाटील :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:12 IST

कोल्हापूर : पॉलिफिल्म खरेदीमधील दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. यासाठी त्यांनी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या दराचा पुरावा दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.मेट्रो पॉलिथिलीन कंपनी ही ‘गोकुळ’ आणि कर्नाटक मिल्क ...

ठळक मुद्देपॉलिफिल्म खरेदीमधील दर फरकाचा परिणाम

कोल्हापूर : पॉलिफिल्म खरेदीमधील दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. यासाठी त्यांनी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या दराचा पुरावा दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

मेट्रो पॉलिथिलीन कंपनी ही ‘गोकुळ’ आणि कर्नाटक मिल्क फेडरेशनला पॉलिफिल्म पुरवठा करते. कर्नाटक मिल्क फेडरेशन, बंगलोरने सीआय फ्लेक्सो प्रिंटिंग ३ कलर प्रिंटिंग पॉलिफिल्म दर प्रतिकिलो जीएसटीसह १३४ रुपये ३७ पैसेप्रमाणे खरेदी केली असून, तेच ‘गोकुळ’ने १४१ रुपये १९ पैशांनी खरेदी केली आहे. यामध्ये प्रतिकिलो ६ रुपये ८२ पैसे फरक दिसून येत आहे.

सीआय फ्लेक्सो प्रिंटिंग ६ कलर प्रिंटिंग पॉलिफिल्म दर प्रतिकिलो जीएसटी १४८ रुपयांप्रमाणे कर्नाटक मिल्क फेडरेशनने खरेदी केले असून, ‘गोकुळ’चा हाच दर १७१ रुपये ८७ पैसे आहे. यामध्ये प्रतिकिलो २३ रुपये ८७ पैसे इतका फरक पडल्याचे दिसून येते. ‘गोकुळ’ने या दोन्ही प्रकारची १९०० टन पॉलिफिल्म खरेदी केली असून, या दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

कर्नाटक मिल्क फेडरेशनचे कार्यकारी संचालक राकेशसिंग यांनी सन २०१७ मध्ये रोटोगॅव्हिअर आणि सीआय फ्लेक्स या फक्त प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहेत. यामध्ये पॉलिफिल्म दर्जामध्ये काही संबंध येत नाही, असे स्पष्ट करीत कॉमन टेंडर प्रसिद्धीला दिले होते. त्यामुळे मेट्रो पॉलिथिन कंपनीने दर कमी करण्याची तयारी दर्शवली. अशा पद्धतीने कर्नाटक मिल्क फेडरेशनने पॉलिथिन कंपनीकडून होणाऱ्या चुकीच्या दर आकारणीला आळा घातला होता, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.‘डुप्लिकेशन’ न होण्यासाठीच जादा खर्च‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही उत्तम पद्धतीने दुग्ध व्यवसाय करीत असताना सुरक्षेबाबत काळजी घेतो. म्हणूनच आम्ही पाच स्तर असलेली आणि सहा रंगांची दूध पिशवी मुंबई आणि पुण्यासाठी वापरतो. अनेकदा डुप्लिकेट पिशव्या तयार करून त्यातून दूधविक्री केली जाते. या पिशव्यांचे डुप्लिकेशन करता येऊ नये यासाठी उपाययोजना केल्यामुळे ही दरवाढ दिसून येत आहे. निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्यासाठीच आता अशी पत्रके काढली जात आहेत.