चांदोली अभयारण्यालगत असलेल्या शित्तूर-वारुण गावासह वाड्या-वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. लक्ष्मी पाटील यांच्या राहत्या घराला लागून असलेल्या शेडमध्ये बांधलेल्या या शेळीवर बिबट्याने हल्ला चढवला. आज सकाळी पाटील या शेडमध्ये गेल्या असता, त्यांना ही शेळी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली.
दरम्यान, मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक शंकर जाधव, शिवाजी भोसले यांनी घटनेचा पंचनामा केला.