शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोल्हापुरात शिवसेनेचे ‘सहा’चे ’दहा’ करणे एवढेच लक्ष्य : कीर्तिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 18:05 IST

कोल्हापुरातील विधानसभेच्या १० जागांपैकी सद्य:स्थितीत सेनेचे सहा आमदार आहेत. त्यांत वाढ करून दहा आमदार निवडून आणणे एवढेच लक्ष्य आपल्यापुढे आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात बहिणींसाठी मोफत हेल्मेट वाटप या कार्यक्रमात ते प्रमुख उपस्थित म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देशिवसेना खासदार गजानन कीर्तिकर राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने मंत्रिपद देण्यासाठी पक्षप्रमुखांकडे विनंती हेल्मेट वाटपाला महापौरांची उपस्थितीयुवा सेनेत अनेकांचा जाहीर प्रवेश

 कोल्हापूर : कोल्हापुरातील विधानसभेच्या १० जागांपैकी सद्य:स्थितीत सेनेचे सहा आमदार आहेत. त्यांत वाढ करून  दहा आमदार निवडून आणणे एवढेच लक्ष्य आपल्यापुढे आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात बहिणींसाठी मोफत हेल्मेट वाटप या कार्यक्रमात ते प्रमुख उपस्थित म्हणून बोलत होते.

खासदार कीर्तिकर म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी हेल्मेट वाटपाचा हा राज्यातील एकमेवाद्वितीय कार्यक्रम हाती घेतला आहे. नावीन्यपूर्ण कामगिरी करीत त्यांनी सलग दोन वेळा आमदारकी जिंकली आहे. यात प्रथम छत्रपती घराण्यातील मालोजीराजे यांना पराभूत केले, तर मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारावर मात केली आहे. त्यात आज पक्षात सुनील मोदी हेही आले आहेत.

ही बाबही मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवेन. अशा प्रकारे आमचे आमदार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे येत्या काळात विधानसभेच्या १० पैकी १० जागा जिंकणे एवढेच लक्ष्य असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने मंत्रिपद देण्यासाठी पक्षप्रमुखांकडे विनंती केली जाईल. त्याची दखल घेऊन ते योग्यवेळी मंत्रिपदासाठी संधी आल्यानंतर नाव सुचवतील.

संपर्क नेते अरुण दुधवडकर म्हणाले, कोल्हापूरची जनता जाणती आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने दोन वेळा सेनेला निवडून दिले आहे. यावेळी माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, जिल्हा शिवसेनाप्रमुख मुरलीधर जाधव, पवन जाधव, आदींनी मनोगत व्यक्त केले.

हेल्मेट वाटपाला महापौरांची उपस्थितीपक्षीय कार्यक्रमामुळे सर्व नेते मंडळींची दोन तास भाषणबाजी झाल्यानंतर अखेरीस महापौर हसिना फरास यांनी हेल्मेट वाटप कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्याची चर्चा उपस्थितांमध्ये होते. त्यांच्या हस्ते काही महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात हेल्मेट वाटप करण्यात आली.

शिवसेनेचे दुर्भाग्यशिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एकही नेता नाही. त्यात राजेश क्षीरसागर हे स्वत:च्या हिमतीवर दोन वेळा आमदार म्हणून जनतेतून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रिपद का दिले जात नाही? हे एक प्रकारे सेनेचे दुर्भाग्य आहे, असे मत माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी मांडले. मी स्वत: कॉँग्रेसचा आहे. तरीही क्षीरसागर माझे मित्र म्हणून या ठिकाणी ही मागणी मी केली आहे. तिचा विचार शिवसेनेतील पदाधिकाºयांनी करावा, अशी विनंतीही इंगवले यांनी केले.

मी शिस्तबद्ध सैनिकइंगवले यांच्या मागणीनंतर आमदार क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात मी एक साधा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. मला बाळासाहेबांमुळे दोन वेळा आमदारकी मिळाली आहे. मी समाधानी असून इंगवले यांनी ही मागणी मित्रप्रेमापोटी व्यक्त केली आहे, असेही स्पष्ट केले.

युवा सेनेत अनेकांचा जाहीर प्रवेशभाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचा बालेकिल्ला असलेल्या तटाकडील तालीम मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष विश्वदीप साळोखे यांनी युवा सेनेत जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे एक प्रकारे जाधव यांना शह दिल्याचे मानले जात आहे. यासह योगेश चौगुले (खंडोबा तालीम), अजिंक्य चौगुले (जुना बुधवार पेठ तालीम), विश्वजित चव्हाण (अध्यक्ष, गंगावेश तालीम), अजिंक्य साळोखे (बालगोपाल तालीम, गणेशोत्सव समिती अध्यक्ष), गुरू लाड (अध्यक्ष, रंकाळवेश तालीम), अविनाश पाटील, अवधूत घाटगे (हिंदू प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडा), ओंकार तोडकर यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

 

 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरPoliticsराजकारण