शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गो. मा. पवार यांचे कोल्हापूरशी घनिष्ठ संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:51 IST

कोल्हापूर : लेखनाला केवळ साहित्य, संस्कृती आणि वाङ्मयापुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजशास्त्राशीही जोडू पाहणारे लेखक गो. मा. पवार ...

कोल्हापूर : लेखनाला केवळ साहित्य, संस्कृती आणि वाङ्मयापुरते मर्यादित न ठेवता त्याला समाजशास्त्राशीही जोडू पाहणारे लेखक गो. मा. पवार यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध होता. शिवाजी विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या सर्जनशील उपक्रमांनी या विभागाचा राज्यात दबदबा निर्माण केला. त्यांच्या मुशीत अनेक लेखक घडले.आधुनिक मराठी साहित्याचे पाठीराखे म्हणून पवार यांचे नाव घेता येईल. शिवाजी विद्यापीठात पहिले विभागप्रमुख म्हणून घेतलेल्या जबाबदारीपासून ते दर्जेदार अभ्यासक्रम, सर्जनशील उपक्रम आणि तज्ज्ञ लेखकांशी मुक्तसंवादातून त्यांनी नवलेखक घडविले. ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभे’च्या वतीने पेठवडगाव येथे भरविण्यात आलेल्या अधिवेशनात त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.विद्यापीठ हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र असले तरी समाजवादी विचारसरणी असल्याने कोल्हापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाशी त्यांची नाळ जुळली होती. मराठीला वाङ्मयाच्या चौकटीत न बसविता तिला सामाजिकशास्त्राची जोड मिळावी यासाठी त्यांची धडपड असायची. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कामगार नेते गोविंद पानसरे यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री जुळली ती या विचारांच्या धाग्यामुळेच. शाहू छत्रपती यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. साहित्यक्षेत्रात रणजित देसाई, शिवाजी सावंत अशा लेखकांशी त्यांचा कायम संवाद असायचा.मराठी विभागाची उभारणीज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार हे सन १९७९ मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये रुजू झाले. त्यांनी विद्यापीठातील मराठी विभागाची उभारणी केली. या विभागाचे ते पहिले प्रमुख होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते, कवी यांना निमंत्रित करून त्यांची चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन असे विविध उपक्रम सुरू केले. १९८४ साली त्यांनी ‘मराठी साहित्य : प्रेरणा आणि समाज’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे नाव राज्यातील अन्य विद्यापीठांमध्येही आदराने घेतले जाऊ लागले. या विभागाचा वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला. ते १९९२ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी., तर २२ विद्यार्थ्यांनी एम. फिल. पदवी संपादन केली आहे.विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन, कार्याचा अभ्यास आणि संशोधन होण्यासाठी अध्यासन स्थापन करण्याबाबत डॉ. पवार यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला सुचविले होते. त्यानुसार सन २००० मध्ये विद्यापीठात ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासना’ची स्थापना करण्यात आली.डॉ. गो. मां.ची ग्रंथसंपदाच्विनोद : तत्त्व व स्वरूपच्मराठी विनोद : विविध अविष्काररूपेच्निवडक फिरक्याच्निवडक मराठी समीक्षाच्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्यच्निवडक महर्षी विठ्ठल रामजी शिंदेच्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : भारतीय साहित्याचे निर्मातेच्महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : समग्र वाङ्मय खंड १ व २च्द लाईफ अँड वर्क्स आॅफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदेमिळालेले सन्मानच्साहित्य अकादमी पुरस्कार नवी दिल्ली च्भैरूरतन दमाणी पुरस्कार सोलापूर च्शिवगिरीजा प्रतिष्ठान पुरस्कार, कुर्डूवाडी च्रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई च्पद्मश्री विखे-पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरा नगर च्महाराष्ट्र फाउंडेशन मराठी साहित्य पुरस्कार, मुंबई च्महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार,च्धोंडिराम माने साहित्यरत्न पुरस्कार, औरंगाबादच्शरद प्रतिष्ठानचा शरद पुरस्कार, सोलापूर च्मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, औरंगाबादज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अतिशय दु:ख होत आहे. शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागाच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू झाल्यानंतर ते मला भेटून गेले होते. एका मोठ्या साहित्यिकाला आपण मुकलो आहोत.- कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे,शिवाजी विद्यापीठ