शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ चले जाव; शाहूवाडी तालुक्यात मराठा आंदोलकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:05 IST

बांबवडे (जि. कोल्हापूर ) : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर रविवारी सायंकाळी पिशवी (ता.शाहूवाडी) येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. पोलिसांंनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलक ...

बांबवडे (जि.कोल्हापूर) : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर रविवारी सायंकाळी पिशवी (ता.शाहूवाडी) येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा देत काळे झेंडे दाखवले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. पोलिसांंनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलक मंत्र्यांपर्यंत पोहचू नयेत यासाठी प्रशासन आणि पोलीस डोळ्यात तेल घालून नियोजन करत असतानाही आंदोलकांनी गनिमी कावा करत हा प्रकार केला.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी शाहूवाडी तालुक्यात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. मराठा समाजाचे बांबवडे येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे. मंत्री खोत हे आळतूर येथील कार्यक्रम आवरून बांबवडेमार्गे पिशवी येथे कार्यक्रमासाठी जाणार होते, तेव्हा ते बांबवडे येथील आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी मार्ग बदलला आणि करंजफेण मार्गे पिशवी येथे दाखल झाले.पिशवी येथील महादेव मंदीरात रविवारी दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदाभाऊंच्या उपस्थितीत बैठक सुरु झाल्यावर काही क्षणातच मराठा समाजाचे आंदोलक आरक्षण मागणीच्या घोषणा देत तेथे आले. त्यांनी काळे झेंडे दाखवून ‘सदाभाऊ चले जाव’ अशा घोषणा दिल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांना किरकोळ लाठीमार करावा लागला. आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.सदाभाऊंना आली चक्करदरम्यान, पिशवी येथील बैठक सुरु असताना सदाभाऊ यांना चक्कर आली. यावेळी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.--------------------------------कोट.........मराठा आरक्षणासाठी आपण आग्रही असतानाही व्यक्तीदोषातून घोषणाबाजी करून लोकप्रतिनिधीना लक्ष्य करणे चुकीचे आहे. काही राजकीय लोक व्यक्ती दोषातुन आंदोलनाला वेगळे वळण देत आहेत.- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री.