गणेश चतुर्थीनिमित्त गावी आलेल्या चाकरमान्यांनी वर्गणी काढून हा उपक्रम पार पाडला. बदलत्या यांत्रिक शेतीच्या काळातदेखील बैलजोडीच्या साहाय्याने शेती कसून पारंपरिक कृषी संस्कृती निष्ठेने जोपासणाऱ्या श्रमाच्या पुजाऱ्यांच्या गौरवाची गडहिंग्लज तालुक्यात विशेष चर्चा आहे.
अलीकडे ग्रामीण भागातदेखील बैलजोड्या बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे आणि शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतीमध्ये आधुनिक यंत्रांचा व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. परंतु, यांत्रिक शेतीला मर्यादा पडतात त्यावेळी अल्प भूधारकांना शेतीच्या लहान-मोठ्या कामासाठी बैलजोड्यांचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे अल्पमोबदल्यात बैलासोबत राबणाऱ्या हातांचा सन्मान झाला पाहिजे, या उदात्त भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बाळगोंडा पाटील यांनी जमिनीची प्रतवारी, खरीप -रब्बी हंगामात घ्यावयाची पिके, अपेक्षित उत्पन्न, आंतरपिके, खतांची मात्रा, शेतीपूरक जोडधंदे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गाव कोरोनामुक्त राहण्यासाठी धडपडलेल्या माया कुंभार, मारुती राजगोळे, सचिन पाटील यांचाही यावेळी सत्कार झाला.
कार्यक्रमास सरपंच अंकुश रणदिवे, पोलीसपाटील उदय कांबळे, दत्ताराम पाटील, बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, विलास पोवार आदी उपस्थित होते. सुधाकर पाटील यांनी स्वागत केले. सुनील अस्वले यांनी आभार मानले.
----
पशुखाद्य पोत्याची भेट..!
बैलजोडी मालकांचा शाल, श्रीफळ व फुल देऊन सन्मान करण्यात आला. सुधीर पाटील यांच्यातर्फे प्रत्येक शेतकऱ्याला पशुखाद्य पोत्याची भेट देण्यात आली. या आगळ्या-वेगळ्या सत्कारामुळे शेतकरी भारावून गेले.
------
फोटो ओळी : नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे प्राचार्य बाळकृष्ण चौगुले यांच्या हस्ते दिनकर दादू पाटील यांचा सत्कार झाला. यावेळी सुधाकर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रमांक : १७०९२०२१-गड-०३