शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तातडीने कर्जे द्या

By admin | Updated: May 24, 2017 00:34 IST

जिल्हाधिकारी : अग्रणी बँक आढावा बैठकीत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : शेतकरी हा आपला तारणहार असून, तो अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकरी कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येता कामा नये, यासाठी संवेदनशील दृष्टीने सर्व बँकांनी शेतकऱ्यांचे हित सांभाळावे. लाभार्र्थी शेतकऱ्याला सुलभरीत्या कर्ज उपलब्ध करून देणे हे बँकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अग्रणी बँक आढावा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराते, नाबार्ड जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, आदी उपस्थित होते.पीक विमा योजना ही शासनाची महत्त्वाची योजना असून, तिचा विशेषत: नदीकाठच्या शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरून लाभ घ्यावा. पुरामुळे शेतीपिकाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढणे शक्य होईल तसेच जिल्ह्यात पीक कर्ज उद्दिष्टाचा पाठपुरावा करताना जिल्हा मध्यवर्र्ती बँकेने केलेले विशेष प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगितले.बैठकीमध्ये, रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराते यांनी विविध योजनांचा आढावा घेताना सर्व बँकांनी रिझर्व्ह बँक व अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली. बैठकीस, विविध शासकीय योजनांची उद्दिष्टे व पूर्तता, महिला बचत गटांना कर्ज वितरण, किसान क्रेडिट कार्ड वितरण तसेच पीक विमा योजना आदी विषयांच्या आढावा घेतला. याप्रसंगी सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व सर्व महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.