शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विनाखंडित वीज द्या, अन्यथा परिणाम भोगा

By admin | Updated: May 4, 2017 01:02 IST

सतेज पाटील : महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्यांना संयम सुटू न देण्याचे आवाहन

कोल्हापूर : वीज महामंडळाच्या गलथान कारभाराचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे जिल्ह्यातील शेती करपत आहे. महावितरणने लक्ष देऊन बारा तास विनाखंडित वीजपुरवठा करावा; अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघतील, असा इशारा माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी दिला. शेतीपंप वीजग्राहकांवर लादलेली विजेची दरवाढ कमी करावी व बारा तास अखंडित वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी येथील ताराबाई पार्कमधील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर बुधवारी दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात पाणीसाठा चांगला असल्यामुळे शेतीही चांगली बहरली आहे. मात्र, महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतीला वेळेत पाणी देता येणे शेतकऱ्यांना शक्य नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आता मात्र आठ दिवसांत त्यांनी या सर्व प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर लाखोंचा मोर्चा काढला जाईल. आमदार पाटील म्हणाले, वीज नाही आणि वीजबिल मात्र भरमसाट वाढविले आहे. वीज दरवाढ तत्काळ रद्द झालीच पाहिजे. शेतीला चालना मिळायला हवी, ही घोषणा करणारे सरकार शेतकऱ्यांना वीज परवाने वेळेत मिळू देत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४१७५ परवाने प्रलंबित आहेत. हे परवाने तत्काळ मिळाले पाहिजेत. यावेळी, उपमहापौर अर्जुन माने, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, गगनबावडा समिती सभापती मंगल कांबळे, बाजार समिती सदस्य विलास साठे, दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील उपस्थित होते.शेतकऱ्यांना भटकण्याची वेळगगनबावडा, करवीर, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांतील शेतकऱ्यांना विजेसाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. खांबावरील फ्युज गेल्यानंतर ती शेतकऱ्यांना बदलावी लागते, यासारखे दुर्दैव नाही, असेही ते म्हणाले. तरीही वीज जाते कोठे?एकीकडे शंभर टक्के वीजबिलाची वसुली असणाऱ्यांना चोवीस तास वीज द्यायची घोषणा करायची आणि सात ते आठ तासच द्यायची. यातही एक-दोन तास भारनियमन करून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहायचा, हा खोडसाळपणा आता बंद केला पाहिजे. भाजप सरकार एकीकडे बारा तास वीज देण्याची घोषणा करीत आहे. राज्यात कोणताही नवीन उद्योग आलेला नाही. तरीही निर्मिर्ती होणारी वीज जाते कुठे? असा सवालही सतेज पाटील यांनी केला.