शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला सत्ता द्या, विकास घडवू

By admin | Updated: May 21, 2017 00:53 IST

सदाभाऊ खोत : शिराळ्यातील मरिआई चौकात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा नगरपंचायतीवर भाजपची सत्ता द्या, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, औद्योगिक विकासाला चालना देऊन या शहराच्या बाजारपेठेचा विकास करू, याचबरोबर पारंपरिक नागपंचमी सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी त्यांनी निवडणुकीतील दादागिरी ठेचून काढण्यासाठी फुटा-फुटावर राज्य राखीव दल तैनात करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. येथील मरिआई चौकात भाजपच्या नगरपंचायत निवडणूक उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. खोत म्हणाले की, केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे विकास साधायचा असेल तर, येथेही भाजपची सत्ता असणे गरजेचे आहे. बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्याप्रमाणे नागपंचमीला पूर्ववैभव प्राप्त करून देऊ. यावेळी आ. शिवाजीराव नाईक यांनी नागपंचमीस आम्हीस परवानगी मिळवू व आमचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे यापुढे नागपंचमीचे नावही विरोधक घेणार नाहीत. आज देशात, राज्यात परिवर्तन घडले आहे, तसे परिवर्तन या शहरातही घडेल. तालुक्याचा सर्वांगीण विकास आपल्या माध्यमातून झाला आह.नागपंचमीबाबत कायदा दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू आहे. विरोधकांनी यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे कोणती संस्कृती घ्यायची, हे आता शिराळकरांनी ठरवायचे आहे, असे रणधीर नाईक यांनी सांगितले. यावेळी इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक, अ‍ॅड. नरेंद्र सूर्यवंशी, अ‍ॅड. नेहा सूर्यवंशी, सत्यजित कदम, विनायक गायकवाड, विद्याधर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, वैशाली नाईक, केदार नलवडे, सुखदेव पाटील, दिलीप कदम, बंडा डांगे, नंदाताई कदम, सारिका पाटील आदी उपस्थित होते. आमच्याकडेच यावे लागेल पंधरा वर्षांत विरोधकांनी नागपंचमीबाबत काहीही केले नाही. आता विरोधकांची सत्ता नसल्याने नागपंचमीच काय, कोणताही प्रश्न असला तरी, त्यासाठी आमच्याकडेच यावे लागेल, असे खोत यांनी सांगितले.