शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

मुलींना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे : सिंधुताई

By admin | Updated: December 30, 2014 23:39 IST

ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा

राशिवडे : ग्रामीण भागातील महिला खऱ्या अर्थाने सबला आहेत. कारण त्यांना समोरच्या पुरुषाच्या नजरेत काय चाललंय हे ओळखता येते. मुलींना स्वातंत्र्य जरूर मिळाले पाहिजे, पण मुलींनाही समजायला हवे की मला ‘मादी’ व्हायचे आहे की ‘माय’, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी केले. पुंगाव (ता. राधानगरी) येथील नवकवी दत्तात्रय महिपती दुरुगले यांच्या ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात व्यक्त केले. दत्तात्रय दुरुगले लिखित ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी बालकवी शाम कुरळे, सांगलीचे उपजिल्हाधिकारी शरद काटकर राधानगरीचे पोलीस निरीक्षक ए. आर. गाडे, भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. मोरे, सरपंच मालुताई बरगे, उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी उपस्थित होत्या.सपकाळ म्हणाल्या, महिलांनीच कसे वागवे हे ठरविले पाहिजे. अंग प्रदर्शन करणारे कपडे आपल्या मुलांना देऊच नयेत. युवकांना उद्देशून त्या म्हणाल्या, बाबांनो, पुढे जा. मात्र, मागे वळून पहा, येऊ द्या संकट, येऊ द्या दु:ख, काट्यावरून चालताना तीही एक दिवस फुले बनतील. ग्रामीण भागात अजूनही पुण्याई बाकी आहे. या पुण्याईवरच देश उभा आहे. भुकेल्यांना जेवण द्या, दीन-दुबळ्यांना मदत करा. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. आर. पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच लक्ष्मण कुलकर्णी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पुंगाव येथे ‘मनमौजी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, शरद काटकर, डी. व्ही. मोरे, शाम कुरळे, आदी उपस्थित होते.