शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा; ‘हरियाणा’ची ‘अरुणाचल’ वर दणदणीत मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:38 IST

रविनाच्या तीन, तर रजनीबालाच्या दोन गोलच्या जोरावर ‘हरियाणा फुटबॉल असोसिएशन’ने ‘अरुणाचल फुटबॉल असोसिएशन’चा ८-० असा दणदणीत पराभव करीत, हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यांत ‘उत्तरप्रदेश फुटबॉल असोसिएशन’, ‘दिल्ली सॉकर असोसिएशन’, ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’, ‘मणिपूर फुटबॉल असोसिएशन’ यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत पुढील फेरीत प्रवेश केला.

ठळक मुद्देमुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा; ‘हरियाणा’ची ‘अरुणाचल’ वर दणदणीत मात उत्तरप्रदेश, दिल्ली सॉकर, इंडियन फुटबॉल, मणीपूरचीही आगेकूच

कोल्हापूर : रविनाच्या तीन, तर रजनीबालाच्या दोन गोलच्या जोरावर ‘हरियाणा फुटबॉल असोसिएशन’ने ‘अरुणाचल फुटबॉल असोसिएशन’चा ८-० असा दणदणीत पराभव करीत, हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यांत ‘उत्तरप्रदेश फुटबॉल असोसिएशन’, ‘दिल्ली सॉकर असोसिएशन’, ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’, ‘मणिपूर फुटबॉल असोसिएशन’ यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत पुढील फेरीत प्रवेश केला.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत बुधवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात ‘हरियाणा फुटबॉल असोसिएशन’ने ‘अरुणाचल प्रदेश फुटबॉल असोसिएशन’चा ८-० असा पराभव केला. यात रविनाने तीन, तर रजनीबाला हिने दोन, रितू, शीतल यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली.

दुसऱ्या सामन्यात ‘उत्तरप्रदेश फुटबॉल असोसिएशन’ने ‘जम्मू आणि काश्मीर फुटबॉल असोसिएशन’चा ६-० असा पराभव केला. यात अंकिता पोतदार हिने दोन, तर नेहा कुमारी, उर्वशी शिकरवार, श्वेता केसी व एका स्वयंगोलची नोंद झाली. तिसऱ्या सामन्यांत ‘मणिपूर फुटबॉल असोसिएशन’ने ‘त्रिपुरा फुटबॉल असोसिएशन’चा २-० असा पराभव केला. यात मणिपूरकडून नागमिकापाम, एस. लिंडाकोम यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली.पोलो मैदान येथे झालेल्या सामन्यात ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’ने ‘कर्नाटक फुटबॉल असोसिएशन’चा ४-१ असा पराभव केला. यात इंडियनकडून अरुणा बाग हिने दोन, तर पियाली रॉय, रुपाली बावरी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. तर कर्नाटकाकडून एकमेव गोलरेखा व्ही. सी. हिने नोंदविला. दुसºया सामन्यात ‘दिल्ली सॉकर असोसिएशन’ने ‘मध्यप्रदेश फुटबॉल असोसिएशन’चा २-० असा पराभव केला. यात ‘दिल्ली सॉकर’कडून अनया गोयाम, अवेकासिंग यांनी गोलची नोंद केली.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर