शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खरंच मुलगी जड होतेय का...? : क्रौर्य धक्कादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:42 IST

आंबा : गाव पातळीवरील शाळा, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग तसेच मीडिया या माध्यमातून मुलीचे स्वागत, मुलगी शिकवा, स्त्रीसन्मान यातून ...

ठळक मुद्देसावर्डी, भेडसगाव येथील घटना मुलीला वाचवा मोहिमेला तिलांजली देणाऱ्या

आंबा : गाव पातळीवरील शाळा, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग तसेच मीडिया या माध्यमातून मुलीचे स्वागत, मुलगी शिकवा, स्त्रीसन्मान यातून मुलगीचा सन्मान आणि स्त्री-पुरुष समानता साधली जात आहे. मात्र, शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी, भेडसगाव येथील घटना मुलीला वाचवा या मोहिमेला तिलांजली देणाºया ठरल्या आहेत.कायद्यानेही महिलांच्या सुरक्षिततेला व जीवनविषयक हक्काला निश्चितपणा प्राप्त करून दिला आहे.

प्रगतीचा टप्पा आणि बदलत्या काळानुसार पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही मानसन्मान व विकासाची संधी दिली जात आहे. असे कोणते क्षेत्र राहिले नाही की त्यामध्ये मुली किंवा महिला मागे आहेत. अशा परिस्थितीत शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथील पाडवे कुटुंबातील जन्मदात्यांनीच आपल्या दोन वर्षांच्या मुलीस थिमेट हे कीटकनाशक पाजून तिचे जीवन संपवले. त्या घटनेची राळ खाली बसते न बसते तोच भेडसगावसारख्या जागृत गावातील तलावात अर्भकाला जलसमाधी देणारे कौर्य घडते. हे सारेच मुलीला वाचवा या मोहिमेला तिलांजली देणारे ठरले आहे.

वंशाला दिवा पाहिजे या पारंपरिक विचारातून मुलगीऐवजी मुलगा हवा अशी कौटुंबिक मानसिकता टिकून आहे आणि त्यातून मुलगीऐवजी मुलगा असा भेदभाव जपणारी मंडळी कमी नाहीत. एकीकडे मुली कोणत्या क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मागे नाहीत हे बदलते आशावादी चित्र असताना मुलग्याचा आग्रह का हा प्रश्न सतावतो. पाडवीसारखी कुटुंबे आणि त्यांची मानसिकता हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल अशी मानसिकता बाळगलेली अनेक मंडळी नजरेआड आहेत.

स्त्री-पुरुष समानता या तत्त्वाला मूरड घालणारी अशी अनेक मंडळी कोणत्या युगात जगतात हा प्रश्नच आहे. एकीकडे मुलांची संख्या वाढत आहे, तर मुलींचा जन्मदर घटत आहे. त्यातून समाज व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून नवे प्रश्न पुढे येत आहेत. निकोप समाज निर्मितीसाठी मानवतेला तिलांजली देणाºया अशा घटनेचा सार्वजनिक निषेध होताना याबाबतची जागृती, समुपदेशन व्यापकपणे होण्याचीगरज आहे.

अंजलीसाठी मदतीचे हातपाडवे कुटुंबातील पोरकी ठरलेल्या अंजलीस विविध संस्थांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. समाजभान जपणारी अशी मंडळी एकीकडे, तर पोटच्या गोळ्याला मारणारी वृत्ती एकीकडे, असे विरोधाभास चित्र आहे.एकीकडे मुली कोणत्या क्षेत्रात मुलांच्या तुलनेत मागे नाहीत हे बदलते आशावादी चित्र असताना मुलग्याचा आग्रह का हा प्रश्न सतावतो.