शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नव्या सरकारकडून शाहू स्मारकाची भेट

By admin | Updated: November 4, 2014 00:24 IST

मुख्यमंत्र्यांसमोर होणार सादरीकरण : सचिवांनी मागितला कोल्हापूर महापालिकेकडे आराखडा

संतोष पाटील- कोल्हापूर -शाहू मिलच्या २६.७५ एकर जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठीचा निश्चित केलेल्या प्राथमिक आराखड्याची सद्य:स्थिती व नव्याने सादरीकरणाबाबत सचिव स्तरावरून महापालिकेला विचारणा करण्यात आली आहे. महापालिकेने १५९ कोटी खर्चाचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) यापूर्वीच शासनाला पाठविला आहे. आता नव्याने स्मारकाबाबत हालचाली गतीमान झाल्या असून नव्या सरकारकडून शाहू स्मारकाची पहिली भेट कोल्हापूरकरांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आघाडी सरकारने दीड वर्षांपूर्वी स्मारकाच्या प्राथमिक आराखडा सादरीकरणावेळी एक कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर राज्य शासनाने वेळोवेळी शाहू स्मारकांबाबत फक्त घोषणाच केल्या. महापालिकेने १९ आॅगस्ट २०१४ला झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्मारकासाठी मंजूर केलेला निधी वर्ग करण्याचा ठराव केला होता. मात्र, सादरीकरणाशिवाय स्मारकाचे काम पुढे सरकू शकले नाही.स्मारकाचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. भव्य असा राजर्षी शाहूंचा पुतळा, वाचनालय, राजर्षी शाहूंचा सचित्र जीवनपट दर्शविणारे केंद्र, स्वागत कमान, सांस्कृतिक केंद्र, खुले सभागृह, वस्तुसंग्रहालय, कलाकुसर वस्तू विक्री केंद्र, वस्त्रोद्योग संग्रहालय, खाऊ गल्ली आदींचा या स्मारकाच्या जागेत समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्मारकाच्या आराखड्याच्या सादरीकरणाची तयारी सुरू आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना संबंधित विभागाच्या सचिवांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील आठवड्यात सादरीकरण होण्याची शक्यता असून यानंतर राज्य शासनातर्फे स्मारकाच्या पूर्ण निधीची घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्प आराखड्याबाबत काही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याप्रमाणे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल. येत्या महिन्याभरात स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंतावाढीव पाच टक्के, वास्तू आरेखक, पीडब्ल्यूडी पडताळणी खर्च, त्रयस्थ समिती सल्लागार, आदींसह संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५९ कोटी रुपयांचा असणार आहे.असा आहे १५९ कोटींचा आराखडाटप्पा एक - ५७ कोटी रुपयेप्रवेशद्वार, स्वागतकक्ष, तळमजला एक माहिती केंद्र, पहिला मजला दोन माहिती केंद्र, वस्तुसंग्रहालय आणि कला केंद्र, वस्तू विक्री केंद्र, प्रशासकीय कार्यालय, वस्त्रोद्योग संग्रहालय, चित्रसंग्रहालय, वाचनालय, खाऊ गल्ली, सुरक्षा भिंतदुसरा टप्पा - ४२ कोटी रुपयेराजर्षी शाहू पुतळा व चबुतरा, मध्यवर्ती इमारत, खुले मंच, कोटितीर्थ तलाव सुशोभीकरण, पार्किंग, अ‍ॅम्पी थिएटर, कारंजा व कृत्रिम धबधबा, सुरक्षा रक्षक खोल्या.टप्पा तीन - प्रस्तावित खर्च -४९ कोटी रुपयेमध्यवर्ती इमारत (आठ सांस्कृतिक भवन), इमारतीभोवती सुशोभीकरण, सांस्कृतिक भवनाचे प्रवेशद्वार, वीज व सौरऊर्जा यंत्रे जोडणी, नळ व अग्निशमन यंत्रणा जोडणी, वातानुकृूलित यंत्रणा जोडणी, बाग परिसराचे सुशोभीकरण.असा आहे १५९ कोटींचा आराखडाटप्पा एक - ५७ कोटी रुपयेप्रवेशद्वार, स्वागतकक्ष, तळमजला एक माहिती केंद्र, पहिला मजला दोन माहिती केंद्र, वस्तुसंग्रहालय आणि कला केंद्र, वस्तू विक्री केंद्र, प्रशासकीय कार्यालय, वस्त्रोद्योग संग्रहालय, चित्रसंग्रहालय, वाचनालय, खाऊ गल्ली, सुरक्षा भिंतदुसरा टप्पा - ४२ कोटी रुपयेराजर्षी शाहू पुतळा व चबुतरा, मध्यवर्ती इमारत, खुले मंच, कोटितीर्थ तलाव सुशोभीकरण, पार्किंग, अ‍ॅम्पी थिएटर, कारंजा व कृत्रिम धबधबा, सुरक्षा रक्षक खोल्या.टप्पा तीन - प्रस्तावित खर्च -४९ कोटी रुपयेमध्यवर्ती इमारत (आठ सांस्कृतिक भवन), इमारतीभोवती सुशोभीकरण, सांस्कृतिक भवनाचे प्रवेशद्वार, वीज व सौरऊर्जा यंत्रे जोडणी, नळ व अग्निशमन यंत्रणा जोडणी, वातानुकृूलित यंत्रणा जोडणी, बाग परिसराचे सुशोभीकरण.