शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी दिग्गजांची गर्दी

By admin | Updated: August 7, 2014 00:22 IST

विधानसभा निवडणूक : पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे यांनी नेले अर्ज

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून कॉँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढण्यास अनेकजण इच्छुक असून, त्यासाठी पक्षाकडे उमेदवारीच्या मागणीचे अर्ज नेणाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण आदी दिग्गजांचा समावेश आहे. प्रल्हाद चव्हाण यांनी आजच, बुधवारी उमेदवारी मागणी करणारा अर्ज भरला आहे.जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची वेळ आल्यास उमेदवार शोधावयास लागू नयेत, म्हणून कॉँग्रेसने इच्छुकांना पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आतापर्यंत २५हून अधिक मान्यवर कार्यकर्त्यांनी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये करवीरमधून पी. एन. पाटील, कोल्हापूर दक्षिणमधून मंत्री सतेज पाटील, कोल्हापूर उत्तरमधून प्रल्हाद चव्हाण, सत्यजित कदम, इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे, राहुल खंजिरे, हातकणंगलेतून जयवंतराव आवळे, राजू आवळे, चंदगडमधून भरमू सुबराव पाटील, अंजनाबाई रेडेकर, सदानंद हत्तरगी, पन्हाळ्यामधून अमर यशवंत पाटील, शिरोळमधून ‘गोकुळ’चे चेअरमन दिलीप पाटील, अनिल यादव, डी. सी. पाटील, कागलमधून परशुराम तावरे, राधानगरीमधून अरुणकुमार डोंगळे यांचा समावेश आहे.उमेदवारी मागणीचे अर्ज ९ आॅगस्टपर्यंत पाच हजार रुपये अनामत रकमेसह कॉँग्रेस कार्यालयात जमा करायचे आहेत. त्यानंतर हे सर्व अर्ज महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समितीकडे पाठवून देण्यात येणार आहेत. तेथून पुढे अखिल भारतीय कॉँग्रेस महासमितीकडे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे.कोल्हापूर उत्तरमधून माजी आमदार मालोजीराजे निवडणूक लढणार नाहीत, अशीच चर्चा कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे कॉँग्रेस पक्षाशी निष्ठा असणाऱ्या शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा निर्णय घेतला आहे. १९९९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून प्रल्हाद चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु, त्यावेळी उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी त्यांची उमेदवारी रद्द करून महादेवराव आडगुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली.