शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

घोडके-कोळेकर कुस्ती बरोबरीत

By admin | Updated: December 3, 2015 23:46 IST

शिरोळ येथे आयोजन : सांगलीचा सुधाकर गुंड दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी

शिरोळ : येथे श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा देवाच्या उरुसानिमित्त बुधवारी (दि. २) रात्री कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठीची कुस्ती समाधान घोडके (कोल्हापूर) विरुद्ध आण्णा कोळेकर (सांगली) यांच्यात अत्यंत चुरशीची झाली. तब्बल १ तास ५ मिनिटेचाललेली ही कुस्ती अखेर पंचांनी बरोबरीत सोडविली. १ लाख १ हजार १११ रुपये या बक्षिसासाठी ही कुस्ती झाली. यादव आखाड्यात तीन लाख रुपयांच्या बक्षिसासाठी १७२ कुस्त्या झाल्या. कुस्ती मैदानासाठी कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक सीमाभागातील मल्लांनी सहभाग घेतला.शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषद मान्यतेने शिरोळ उरुस समिती व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानातील यादव आखाडा येथे बुधवारी दुपारी चार वाजता स्पर्धेस प्रारंभ झाला. उत्कृष्ट कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्रदेश कॉँग्रेसचे राज्य सरचिटणीस सत्यजित देशमुख होते. दुसऱ्या क्रमांकासाठी आमदार केसरी संग्राम पाटील (कोल्हापूर) विरुद्ध सुधाकर गुंड (सांगली) यांच्यातील कुस्ती २५ मिनिटे झाली. दोन्ही मल्लांनी चमकदार खेळ दाखविला. मात्र, कुस्ती निकाली झाली नाही. त्यामुळे पुन्हा पाच मिनिटे देण्यात आली. यामध्ये गुणावर सुधाकर गुंड हा कुस्ती जिंकून ५० हजार रुपयांचा मानकरी ठरला. कुस्ती मैदानात प्रमुख विजेते मल्ल व त्यांची गावे : बाळू पुजारी (कोथळी), स्वप्नील कोरवी (शिरदवाड), कुबेर पुजारी (कोथळी), सागर धनगर (शिरोळ), हरी वाघमारे (शिरोळ) यांनी विजय मिळविला. तसेच लहान, मोठ्या गटांतील कुस्ती स्पर्धा यावेळी पार पडल्या. कुस्ती पाहण्यासाठी शिरोळसह परिसरातील कुस्तीशौकिनांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, संभाजी पाटील, महापौर केसरी अमृता भोसले, विठ्ठल मोरे, ‘दत्त’चे संचालक अनिलराव यादव, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील उपस्थित होते. कुस्ती निवेदक म्हणून शंकर पुजारी, नंदू सुतार (कवठेसार) यांनी काम पाहिले. प्रकाश गावडे, देवाप्पा पुजारी, रावसाहेब देसाई, मजीद अत्तार, शिवाजी मोळे, संजय देबाजे यांनी पंच म्हणून काम पाहिले. उरूस समितीचे प्रमुख शिवाजी भाट, उपसरपंच पृथ्वीराज यादव, पुंडलिक कुरणे यांनी कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)