सांगली : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच सांगलीला महाराष्ट्र अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्षपद मिळाले आहे. सांगलीच्या गौतम पाटील यांनी हा करिष्मा करून दाखविला आहे. मुरब्बी पदाधिकाऱ्यांचा सत्तासंघर्ष, शक्तिप्रदर्शन आणि विरोधकांची रणनीती उधळून लावत गौतम पाटील अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. रविवारी दुपारी चेंबूर (मुंबई) येथील जवाहर विद्या भवनमध्ये महाराष्ट्र अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. ऐनवेळी विरोधकांनी माघार घेतल्याने अध्यक्षपदाची माळ गौतम पाटील यांच्या गळ्यात पडली. संघटना विदर्भ-मराठवाड्याकडे खेचून नेण्यासाठी विरोधी मंडळींनी मोठे रान उठविले होते. गौतम पाटील समर्थकांनीही विजयासाठी मोठी ‘फिल्डिंग’ लावली होती. पाटील यांच्या समर्थनार्थ तीसपेक्षा अधिक कार्यकर्ते सांगलीतून चेंबूरमध्ये दाखल झाले होते. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. . राज्यातील २६ संलग्न जिल्हे व तेरा आजीव सभासदांनी मतदान केले. सांगली जिल्'ाच्या खात्यात दोन महत्त्वाच्या पदांची नोंद झाली. सांगलीचे गौतम पाटील अध्यक्षपदी, तर मिरजेचे दीपक सावंत सहसचिवपदी निवडून आले. पाटील हे सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष, तर सावंत सचिव आहेत. जिम्नॅस्टिकच्या अभेद्य गडावर स्वारी करून हा गड सांगलीकडे खेचून आणण्यात राज्य संघटनेचे सचिव महेंद्र चेंबूरकर व राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक सावंत यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनवर निवडून आलेले नूतन पदाधिकारी असे : अध्यक्ष : गौतम पाटील (सांगली), उपाध्यक्ष : धनंजय दामले (पुणे), सुभाष भांडारकर (नागपूर), के. जी. जाधव (कोल्हापूर), तुळशीराम खडके (जळगाव), नंदन वेंगुर्लेकर (सिंधुदुर्ग), सतीश सेठ (ठाणे), बाळू ढवळे (ठाणे), अध्यक्ष : आ. संजय केळकर (ठाणे), सरचिटणीस : सविता मराठे (पुणे), खजिनदार : भूषण भावे (लातूर), सहसचिव : दीपक सावंत (सांगली), मंदार म्हात्रे (मुंबई), संदीप आढाव (पुणे), विजय रोकडे (कोल्हापूर), अजित शिंदे (रायगड), विजय पैरकर (बुलडाणा). सदस्य : आशिष सावंत (रायगड), अनिल सहारे (गोंदिया), राजेंद्र बनमारे (वर्धा), मंगेश इंगळे (पालघर), राकेश केदारे (नाशिक), निखिल भंडारे (सातारा). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अजयकुमार भोसले यांनी, तर निरीक्षक म्हणून अशोक साहू यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी) मतदारांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून काम करेन. सांगलीत लवकरच दक्षिण आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा व प्रिमिअर लिग स्पर्धा घेण्याचे नियोजन केले जाईल. जिल्ह्याला मोठ्या संघर्षातून मिळालेल्या या पदाचा खेळाडूंच्या विकासासाठी उपयोग करेन.- गौतम पाटील(अध्यक्ष, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असो़सिएशन)उद्या सांगलीतून मिरवणूक़..एखाद्या राज्य एकविध खेळ संघटनेचे अध्यक्षपद सांगली जिल्'ाला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अध्यक्ष गौतम पाटील यांची २ जून रोजी शांतिनिकेतन येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे दीपक सावंत व महेश पाटील यांनी सांगितले.
राज्य जिम्नॅस्टिक असो.च्या अध्यक्षपदी गौतम पाटील
By admin | Updated: June 1, 2015 00:16 IST