शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गव्यांचे तुळशी खोऱ्यात वास्तव्य, म्हालसवडे परिसरातील शेतीचे केले प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 16:58 IST

तेरसवाडी पैकी मल्लेवाडी येथील लोळजाई पठारावर तर गव्यांची वस्तीच निर्माण झाली आहे. येथून गव्यांचे वेगवेगळे कळप सातेरी महादेव डोंगर व या परिसरातील वाड्या वस्त्या आणि तुळशी खोर्‍यातील शेतकर्‍यांना त्रासदायक ठरू लागले आहेत.

म्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळशी खोऱ्यात गेल्या काही दिवसापासून रानगव्यांचा वावर वाढला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून म्हालसवडे परिसरात गव्यांच्या कळपाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. तेरसवाडी पैकी मल्लेवाडी येथील लोळजाई पठारावर तर गव्यांची वस्तीच निर्माण झाली आहे. येथून गव्यांचे वेगवेगळे कळप सातेरी महादेव डोंगर व या परिसरातील वाड्या वस्त्या आणि तुळशी खोर्‍यातील शेतकर्‍यांना त्रासदायक ठरू लागले आहेत.म्हालसवडे येथील गायरानात जंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील घनदाट वनराईत गव्यांचे वास्तव्य असलेले शेतकर्‍यांच्या निदर्शनास येत आहे. निकम नाळवा, वरपे नाळवा, पटंगाचा माळ, शिंदे नाळवा इथे रोज रात्री गव्यांचे कळप फिरत आहेत. गव्यांनी येथील शेतातील ऊस व शाळू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हेच गवे म्हालसवडे, राशिवडे, सोनाळी व हसुर दुमाला या पंचक्रोशीतील शेतीतून रात्रीचे फिरताना निदर्शनास येत आहेत.यामुळे पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी पाजावयास जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसापासून गव्याने ठाण मांडले आहे. भुयेवाडीत तर या बिथरलेल्या गव्याने एकाचा जीवच घेतला तर चौघे जण जखमी झाले. या गव्याच्या मागावर आता वन विभागाची पथके लागली आहेत. मात्र या पथकांनाही या गव्याने चकवा दिला आहे. त्यामुळे शेवट पर्याय म्हणून वन विभागाने आता या गव्यास बेशुद्ध करुन वनक्षेत्रात सोडण्यासाठी कराडहून प्रशिक्षित कर्मचारी शुटर गनसह कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

"सकाळी लवकर शेतात गेलो असता अचानक एक गवा अंगावर धावून आला. माझ्या शेतातील दहा गुंठे क्षेत्रातील उसाची लागण गव्यांनी पूर्णतः उद्ध्वस्त केली आहे. या गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. - दिलीप वरपे- शेतकरी (म्हालसवडे )

टॅग्स :kolhapurकोल्हापूर