शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर ठाण मांडलेल्या गव्याचे अखेर नैसर्गिक अधिवासाकडे मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 19:01 IST

गेल्या काही दिवसापासून गव्याचा, बिबट्यांचा वावर मानवी वस्तीतील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोल्हापूर : येथील पंचगंगा घाट जामदार क्लब परिसरात दिवसभर गव्याने ठाण मांडले होते. अखेर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गवा शिंगणापूरच्या दिशेने मूळ अधिवासाकडे निघून गेला अन् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.पंचगंगा घाट परिसरात गवा दिसताच नागरिकांनी गव्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी व्हिडिओ करत हा गवा रेडा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला.  पंचगंगा घाट जामदार क्लब परिसरात दिवसभर गव्याने ठाण मांडले. तेथील महादेव मंदिराजवळील झुडपात त्याने विसावा घेतला. तो नागरी वसाहतीमध्ये येवू नये, यासाठी वन विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, अग्नीशमन दलाचे जवान तैनात होते. या परिसरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.

तो नागरी वस्तीकडे येवू नये, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. तो आक्रमक झाल्यास अनुचित प्रकार घडण्याचा धोका असतो. म्हणून हुसकावून मूळ अधिवासात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. केवळ त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात आली होती.काल, गुरुवारी (दि. ९) बोंद्रेनगर - पाडळी - मार्गावरील गगनगिरी पार्कमधील सुरेश सूर्यवंशी यांच्या घराच्या कंपौंडमध्ये गवा आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले. नागरिकांनी गव्याचा पाठलाग करत त्याला बालिंगेमार्गे हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गवा बालिंगे मार्गाकडे गेला. दरम्यान, कोल्हापुरातील लक्षतिर्थ वसाहतीत काल, रात्रीच्या सुमारास कुत्र्यांनी सारा परिसर भुंकुन जागा केला. लक्षतिर्थ तळ्यालगत मोहितेंचे घर व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शाळेजवळ एक मोठा गवा होता. त्याला कुत्र्यांनी पुरता घेरला होता. गवा लक्षतिर्थ वसाहतीत येऊ नये व त्याला उत्साही गर्दीचा फटका बसू नये म्हणून काही तरुणांनी त्याला दुरुनच हुसकावुन लावले. व पुढच्या गोंधळालाही रोखले.वन किंवा वन्यजीवसंदर्भात एखादी घटना घडल्यास कार्यालयीन वेळेशिवाय वन विभागात संपर्क होत नाही. यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी टोल फ्री क्रमांक तयार करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर