शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नगरपालिकांसाठी सगळीकडेच ‘गमतीजमती’

By admin | Updated: November 12, 2016 00:52 IST

बहुरंगी लढतीचे चित्र : तोडफोडीचे राजकारण उफाळले

कोल्हापूर : नगरपालिका माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय उलथापालथी होऊन अंतर्गत राजकारण उफाळून आल्याने कागल, मुरगूडमध्ये शिवसेना-भाजप आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसते. पेठवडगावमध्ये यादव गटाचे विद्यमान उपनगराध्यक्ष मोहन माळी व दिलीपसिंह यादव यांनी सत्तारूढ यादव गटाशी काडीमोड घेत सालपे-युवक क्रांती आघाडीशी घरोबा केला. गडहिंग्लज वगळता एकाही ठिकाणी शिवसेना-भाजपची आघाडी होऊ शकली नसल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी योजलेला महाआघाडीचा प्रयत्न फसल्याचे स्पष्ट झाले. पक्ष व नेत्यांनी सोयीनुसार आघाड्या केल्यामुळे सगळीकडे गमतीजमती झाल्या आहेत. कुणी कुणाला मिठ्ठी मारताना पक्षीय तत्वे, पारंपारिक विरोधक किंवा गटाचे राजकारण हे सगळेच गुंडाळून खुंटीला ठेवल्याचे चित्र पुढे आले आहे. भाजप-शिवसेनेचे जसे जमले नाही तसेच दोन्ही काँग्रेसमध्येही अनेक ठिकाणी बिनसले. राज्यपातळीवर काही होऊ दे; पण कोल्हापुरात शिवसेना-भाजप-स्वाभिमानीची महाआघाडी करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी कंबर कसली होती. विशेष म्हणजे कागल, मुरगूड, गडहिंग्लजमध्ये आघाडी करून राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्याची रणनीती मंत्री पाटील यांची होती; पण शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीशी संधान साधल्याने युतीबाबत सुरुवातीपासून साशंकता होती. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व संजय मंडलिक यांनी युती झाल्याचे जाहीर केले होते; परंतु अखेरपर्यंत माघार घेऊन युतीला आकार देणे जमले नाही. जागावाटपाचे निमित्त ठेवून दोन्ही गटांनी फारकत घेतल्याचे चित्र आहे. मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी कागलमध्ये राष्ट्रवादीबरोबर संधान साधले, तर मुरगूडमध्ये स्वबळावर शड्डू ठोकला आहे, पण याबाबत दोन्ही गटांच्या नेत्यांनी दुजोरा दिला नसून, अद्याप महाआघाडी कायम असल्याचा दावा केला आहे. पेठवडगावमध्ये सत्तारूढ यादव गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहन माळी यांना आपल्या उमेदवारीबद्दल साशंकता निर्माण झाल्याने त्यांनी सालपे-युवक क्रांती आघाडीशी समझोता केला. स्वर्गीय विजयसिंह यादव यांचे बंधू दिलीपसिंह यादव यांनी यादव गटाला रामराम करीत युवक क्रांती आघाडीबरोबर राहणे पसंत केल्याने सत्तारूढ गटाला हादरा बसला. जयसिंगपूरमध्ये ताराराणी आघाडी पक्षाचे सूर्यकांत जाधव व शोभा धोत्रे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने येथे ‘ताराराणी’ला अपक्षांना पुरस्कृत करावे लागले. इचलकरंजीमध्ये शुक्रवारी शेवटच्या क्षणी अनेक राजकीय घडामोडी घडल्या व कॉँग्रेसचे जाफर मुजावर यांनी माघार घेतल्याने ‘ताराराणी’चे संजय तेलनाडे बिनविरोध झाले. गडहिंग्लजमध्ये दोन्ही कॉँग्रेसचे एकत्रित लढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यात याबाबत चर्चा सुरू होती; पण ऐन वेळी जागावाटपावरून बिघाडी झाल्याने कॉँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र आहे. पन्हाळयामध्ये ‘जनसुराज्य’ पक्षाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराविरोधात एकास एक लढत देण्यासाठी मोकाशी व भोसले गटांमध्ये तडजोड करण्याचे आमदार सत्यजित पाटील व आमदार अमल महाडिक यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले; पण त्यात यश आले नाही.बंडखोरीची सगळ्यांनाच लागण!सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. स्थानिक नेत्यांनी बंडखोरी टाळण्यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यात यश न आल्याने सर्वच नेते धास्तावले आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेचा प्रचार करणारकागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदरच्या घडामोडीनुसार शिवसेनेला पाच जागा सोडल्या होत्या. तिथे राष्ट्रवादीला उमेदवारच न मिळाल्याने आता शिवसेनेच्या चिन्हावर असलेल्या दोन उमेदवारांचा प्रचार राष्ट्रवादी करणार आहे.निर्वाणीचा इशारा..कागल नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून बिल्कीश मुश्रीफ या आमदार मुश्रीफ यांच्या भावजयही रिंगणात उतरल्या आहेत. मुश्रीफ यांना ही बंडखोरी टाळता आली नसल्याने रमेश माळी यांच्या पत्नी ह्याच आमच्या अधिकृत उमेदवार आहेत व त्यांच्या विजयासाठीच सगळ््यांनी झटायचे आहे, तसे करणार नसतील ते माझे कार्यकर्ते नसतील, असा निर्वाणीचा इशारा त्यांना द्यावा लागला आहे.मंडलिकांची तडजोड कशासाठी..लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेण्याचा पवित्रा घेतला. नगरपालिका निवडणुकीतील यश-अपयशापेक्षा पुढील निवडणुका महत्त्वाच्या असल्यानेच या घडामोडी घडल्याची चर्चा कागलमध्ये आहे.