शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
2
पाकिस्तानने 'या' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी, १६ नागरिकांच्या मृत्यूनंतर 'उशिराने शहाणपण'
3
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
4
हसतं खेळतं घर उद्ध्वस्त! बसच्या भीषण आगीत कुटुंब संपलं; आई-वडिलांसह २ मुलांचा मृत्यू
5
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
6
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
7
अ‍ॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अ‍ॅप! काय आहे कारण?
8
गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण
9
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
10
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
11
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
12
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
13
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
14
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
15
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
16
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात
17
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
19
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
20
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?

कचरा, दूषित पाण्यासह खड्ड्यांपासून होणार मुक्ती

By admin | Updated: January 2, 2015 00:18 IST

महापालिकेचा पुढाकार : शहरवासीयांचे जगणे होणार सुखकर; रंकाळा घेणार मुक्त श्वास

संतोष पाटील - कोल्हापूरसिग्नलसह रस्ते, काळम्मावाडी पाईपलाईन योजना मार्गी लावण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. नवीन वर्षात पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ‘मैलाचा दगड’ ठरणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र, ७२ किलोमीटरच्या ड्रेनेज लाईनसह कचऱ्यापासून मुक्तीसाठी टाकाळा खणीतील लँडफिल साईट ही शहरवासीयांसाठी महापालिकेने दिलेली ‘गुड न्यूज’ ठरणार आहे.होर्डिंग्जना दणकाउच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका तसेच महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५च्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने हद्दीतील अवैध जाहिरात फलक (होर्डिंग) हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. कायद्याचा बडगा हाती घेत महापालिकेने कारवाईचा जोर सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याने नवीन वर्ष शहरासाठी होर्डिंगमुक्तीचे असेल.वाहतुकीला शिस्तशहरातील वाहनांबरोबरच बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अरुंद रस्ते व बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतूक कासवगतीने सुरू असते. कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नर, संभाजीनगर, ताराराणी पुतळा, व्हीनस कॉर्नर, सीपीआर चौक, आदी २२ महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्यात महापालिकेला यश आले. येत्या वर्षभरात मल्टिलेव्हल पार्किंगसह अवैध बांधकामाला चाप लावून पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन प्रशासनाने केल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्पष्ट केले.पेड प्रीमियममुळे घरांच्या किमती घटणारकोल्हापूर महापालिकेने दिलेल्या ३३ टक्के पेड-प्रीमियमच्या प्रस्तावास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला. यातील महापालिकेला उत्पन्नातील सर्व हिस्सा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासूनच किमान २५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. यामध्ये दरवर्षी किमान १० ते १५ टक्के वाढ अपेक्षित असली तरी घरांच्या किमतींमध्ये मोठा फरक होऊन त्या अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.शाहू स्मारकाची आसदि. ७ जानेवारी २०१४ रोजी कोल्हापुरातील छत्रपती शाहू मिलच्या २७ एकर जागेवर उभारावयाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाच्या संकल्पचित्र आराखड्यास तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली. हे स्मारक उभारताना छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासाठीचा २७९ कोटींचा प्राथमिक आराखडा प्रशासनाने तयार केला असून, नव्या सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच स्मारकाच्या कामास सुरुवात होणार आहे.रंकाळ्यासाठी १०० कोटींचा प्रस्तावराष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषण मुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रंकाळ्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे. रंकाळ्याला ११८ वर्षे पूर्ण झाल्याने नाशिकच्या धरण सुरक्षा संस्थेकडून (डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन) पाहणी करावी, रंकाळ्याच्या नैसर्गिक पुनर्भरण व मजबुतीकरणासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करावा, अशी विनंती महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. नव्या वर्षात रंकाळ्यासाठी निधीचा पाऊस पडणार आहे.१०४ नव्या कोऱ्या बसेसकेंद्र सरकारकडून प्राप्त ४४ कोटी रुपयांच्या निधीच्या जोरावर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची धमनी असलेल्या के.एम.टी.ला ऊर्जितावस्था येणार आहे. १०४ नव्या बसेस मार्च २०१५पर्यंत के.एम.टी.च्या ताफ्यात दाखल होणार आहेत. जीपीएस यंत्रणेसह अत्याधुनिक वर्कशॉप व पिकअप शेडस्मुळे शहरातील के.एम.टी.चा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.खड्डेमुक्त कोल्हापूरसंपूर्ण शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने शहरातील लहान-मोठे १५० हून अधिक रस्ते करण्याची योजना आखली. गेली साडेतीन वर्षे रखडलेली ३९ किलोमीटर रस्त्यांची १०८ कोटींची नगरोत्थान योजनाही ठेकेदारांच्या प्रतिसादामुळे मार्गी लागली आहे. यामुळे नवीन वर्ष ‘खड्डेमुक्त कोल्हापूर’चे ठरणार आहे.काळम्मावाडी योजनाकेंद्र व राज्य शासनासह महापालिकेचा हिस्सा असलेल्या ४७९ कोटींच्या ५२ किलोमीटरच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची सुरुवात खऱ्या अर्थाने नव्या वर्षात होणार आहे. रस्त्याकडेच्या जागेतून पाईपलाईन टाकण्यासाठी जिल्हा परिषद, ‘पीडब्ल्यूडी’कडे परवानगीची मागणी महापालिकेने केली आहे. ठेकेदाराने मागणी केलेल्या स्पायरल वेल्डेड पाईपचा पुरवठा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या कामास नव्या वर्षातच प्रारंभ होणार आहे.पंचगंगा प्रदूषणप्रश्नी सजगताउच्च न्यायालयाने नेमलेल्या दि नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी)ने राधानगरी धरण ते नृसिंहवाडीपर्यंतच्या नऊ ठिकाणांच्या पाण्याची तपासणी केली. न्यायालयाने याप्रश्नी उच्चस्तरीय समिती नेमून दर तीन महिन्यांनी आढावा अहवाल देण्याचे आदेश दिले. परिणामी प्रदूषणास जबाबदार घटकांना चाप बसून याप्रश्नी सजगता निर्माण होण्यास मदत होणार आहे.