शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -बाजारपेठेत गणेशोत्सवाची लगबग, हरितालिका पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:55 IST

महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गुंतले आहेत.

ठळक मुद्देबाजारपेठेत गणेशोत्सवाची लगबग, हरितालिका पूजन हरितालिका पूजन 

कोल्हापूर : महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गुंतले आहेत.उद्या गणेशचतुर्थी आहे त्यानिमित्त घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. यंदा या सणावर कोरोनाचे सावट आहे. नागरिकांच्या मनात भीती असल्याने बाजारपेठेतील गर्दीत बाहेर पडून आरासचे साहित्य खरेदी करण्याची मानसिकता नागरिकांची नाही. त्यामुळे गतवर्षीच्याच साहित्यावर यंदा निभावून न्यावे लागणार आहे.कोल्हापुरातील बाजारपेठेत गुजरात, मुंबई येथून माल येतो. यंदा तेथे कोरोनाचा जास्त कहर असल्याने माल आलेला नाही. आणायला जायचे म्हणजे व्यावसायिकांना क्वारंटाईनची प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनी गेल्यावर्षीचाच माल बाजारात विक्रीसाठी काढला आहे.गणेशोत्सवाला दोन दिवस राहिले असले नागरिक सांभाळूनच साहित्यांची खरेदी करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, गर्दी टाळून साहित्यांची खरेदी केली जात आहे. दुपारी शहरातील बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड, या ठिकाणी नागरिक साहित्यांची खरेदी करत होते.हरितालिका पूजन गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आज, महिलांनी हरितालिका पूजन केले. चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका तर असंख्य सौभाग्य व कुटुंबात सुख, शांती लाभावी म्हणून महिला हे व्रत करतात. पाटावर वाळूपासून शंकराची पिंड तयार केली जाते. त्यावर बेलपत्री वाहून, धूपआरती करून दिवसभर व्रतस्थ राहिले जाते. या व्रतासाठी बेलपत्री, वस्त्रमाळ, धूप, आरती, फळ अशा पूजेच्या साहित्यांची महिला खरेदी करत होत्या.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर