शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival : घरगुती गणेशोत्सव यंदा पाचच दिवस, बुधवारी हरितालिका पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:32 IST

मंगलमूर्ती गणपती बाप्पा घरी आले की वातावरण भक्तीने भारलेले असते. देवाची रोजची पूजाअर्चा, नैवेद्य, पाहुणचार करताना आबालवृद्ध आनंदात असतात. यंदा मात्र घरगुती गणपती पाचव्या दिवशी विसर्जित होणार असल्याने भक्तांना हा आनंद केवळ पाचच दिवस घेता येणार आहे.  बुधवारी घरोघरी हरितालिका पूजन होणार आहे.

ठळक मुद्देघरगुती गणेशोत्सव यंदा पाचच दिवसबुधवारी हरितालिका पूजन

कोल्हापूर : मंगलमूर्ती गणपती बाप्पा घरी आले की वातावरण भक्तीने भारलेले असते. देवाची रोजची पूजाअर्चा, नैवेद्य, पाहुणचार करताना आबालवृद्ध आनंदात असतात. यंदा मात्र घरगुती गणपती पाचव्या दिवशी विसर्जित होणार असल्याने भक्तांना हा आनंद केवळ पाचच दिवस घेता येणार आहे.  बुधवारी घरोघरी हरितालिका पूजन होणार आहे.तो येणार-येणार म्हणत ज्याच्या आगमनाची आपण आतुरतेने जय्यत तयारी करीत आहोत, त्या लाडक्या गणरायाचे गुरुवारी मोठ्या जल्लोषात स्वागत होणार आहे. त्यासाठी घरोघरी स्वच्छता, आरास, खिरीच्या नैवेद्याची तयारी सुरू आहे. मंडळांकडूनही उत्सवाच्या नियोजनाची, तयारीची लगबग सुरू आहे.

गणपतीचे आगमन झाले की घरोघरी अलौकिक भक्तीची अनुभूती येते. आबालवृद्ध, कुटुंबातील हेवेदावे, वादविवाद, तंटा विसरून एकमेकांच्या साथीने देवाची भक्ती करतात. सुंदर आराशीने घराचे रूप खुलून येते. गोडाधोडाचे जेवण होते. सकाळ-संध्याकाळ आरती, नैवेद्य, प्रसाद वाटप यांत मोठ्यांसह लहानग्यांचा दांडगा उत्साह असतो. गेली दोन वर्षे घरगुती गणेशोत्सव सात दिवसांचा होता. सातव्या दिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन झाले होते. यंदा मात्र त्यातील दोन दिवस कमी झाले असून, घरगुती गणेशोत्सव पाचच दिवसांसाठी रंगणार आहे.बुधवारी हरितालिका पूजन आहे. या दिवशी कुमारिका चांगला पती मिळण्यासाठी व सुवासिनी अखंड सौभाग्य व कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी शंकराची आराधना करतात. गुरुवारी (दि. १३) गणेशचतुर्थी असून त्या दिवशी घरगुती व मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. शुक्रवारी (दि. १४) ऋषिपंचमी आहे; तर शनिवारी सोनियाच्या पावलांनी गौराईचे आगमन होणार आहे.

या दिवशी गौराईला वडी, भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. रविवारी (दि. १६) शंकरोबाचे आगमन व गौराईचे पूजन होते. या दिवशी गौरी-गणपती, शंकरोबा या परिवार देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी घरोघरी हळदी-कुंकूचे आयोजन केले जाते. सोमवारी (दि. १७) ज्येष्ठा गौरी व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.यंदा पाचव्याच दिवशी भक्तांना गणपती बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे. घरगुती गणपती गेले की नागरिकांची पावले मंडळांच्या देखाव्यांकडे वळतात; त्यामुळे यंदा मंडळांना देखाव्यांसाठी घाई करावी लागणार आहे. 

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर