शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव साधेपणाने, सगळा पैसा पूरग्रस्तांसाठी; गणेश मंडळांची सामाजिक बांधिलकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 21:09 IST

मंगळवार पेठ परिसरातील सुमारे १२५ गणेश मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

कोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंगळवार पेठ परिसरातील सुमारे १२५ गणेश मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. उत्सवाचा डामडौल, सजावट, देखावे रद्द करून जमा झालेला सगळा निधी पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी देण्यात येणार आहे. शुक्रवारी दैवज्ञ बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे; त्यासाठी कोल्हापूरकरांची जय्यत तयारी सुरू असताना महापुराने थैमान घातले. गावं, घरं, जनावरे, आयुष्यभराची जमापुंजी, संसार सगळं नद्यांनी आपल्या कवेत घेतले. ओसरत असलेल्या पुराने नागरिकांच्या डोळ्यांत मात्र अश्रूंचा महापूर आणला आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी मंगळवार पेठ परिसरातील सुमारे सव्वाशे तरुण मंडळे शुक्रवारी दैवज्ञ बोर्डिंग येथे एकत्र आली.मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस यांचेत झालेल्या बैठकीत एकमताने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करून जमा झालेल्या वर्गणीचा पैसा पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019