शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गणेशमूर्ती, निर्माल्य दानाचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 03:41 IST

त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.

कोल्हापूर : वाजत-गाजत आलेल्या गणपती बाप्पांचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करताना पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात ३ लाखांवर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले जाते. तर शंभर टक्के निर्माल्य दान केले जाते. त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक, सांस्कृतिक, पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. जे-जे चांगलं ते अंगीकारत कोल्हापूरकरांनी नवा आदर्श राज्याला दिला. त्याचाच एक भाग म्हणजे पर्यावरणपूरक आणि विधायक गणेशोत्सव आहे.>नागपूर । तलावात विसर्जनाला बंदीपर्यावरण संवर्धनाचा विचार करता शहरातील तलावात विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या १० झोन क्षेत्रात २५० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे; सोबतच येथे निर्माल्य संकलन केले जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.>अकोला । वºहाडात घरीच विसर्जनअकोलेकरांनी गणेश मूर्तींचे शक्यतोवर घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले आहे. काही ठिकाणी गणेश घाट निर्माण केले जातील. वाशिम व बुलडाण्यात घरोघरीच गणेश विसर्जन करावे, यावर भर दिला जाणार आहे.>अहमदनगर। पालिकेची वाहने सज्जविसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती घेण्यासाठी महापालिकेची वाहने तैनात असतील. या वाहनात मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी द्यायची आहे. या वाहनातून सर्व मूर्ती तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक प्रभागातही विसर्जन कुंड तयार करणार आहे.>कोल्हापूर । पूरग्रस्तांना मदतीचा हातकोल्हापूर शहरसह जिल्ह्यातसात हजारांवर गणेश मंडळे आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवाआधी कोल्हापुरात महापूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं. मंडळांनी एक रुपयाचीही वर्गणी न घेता साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. तसेच स्वखर्चातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांपासून ते त्यांचे घर उभारून देण्यापर्यंतची मदत केली.>औरंगाबाद । विहिरींची सफाई लवकरच पूर्णशहरात दरवर्षी ११ ठिकाणच्या विहिरींमध्ये श्री गणेश विर्सजन व्यवस्था असते. महापालिकेने या विहिरींची सफाई तसेच त्या ठिकाणी मुरुम टाकून रस्ता तयार करणे, लाकडांचे बॅरिगेट्स लावण्यासह इतर कामांच्या निविदा मागविल्या. सर्व विहिरींच्या सफाईचे काम ४४ लाख रुपयांमध्ये देण्यात आले असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.>नाशिक। नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर यंदाही भरनाशिक महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर अधिक भर दिला आहे. नाशिक शहरातील गोदावरी, नंदिनी, वालदेवी या तीन नद्यांवरील ३२ ठिकाणी विसर्जन स्थळे अधिकृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर विविध प्रभागांमध्ये ३५ कृत्रिम कुंड तयार करण्यात येणार आहेत. तसेच विसर्जित मूर्ती दानाचा उपक्रम राबवून नद्या प्रदूषणविरहित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.