शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Visarjan 2018 : कोल्हापुरात पोलिसांचा खडा पहारा, सामाजिक संस्था तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 20:18 IST

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून तत्परपणे सुरू होते.

ठळक मुद्देकोल्हापुरात पोलिसांचा खडा पहारासामाजिक संस्था तत्पर

कोल्हापूर : कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून तत्परपणे सुरू होते.मिरवणूक मार्गासह पंचगंगा नदी घाट, इराणी खण आदी विसर्जन ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. ‘व्हाईट आर्मी’ चे स्वयंसेवक मिरवणूक मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत होते. वैद्यकीय पथकांमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, डॉक्टरांची निहा संघटना, कोल्हापूर जिल्हा मुस्लिम मेडिको आणि पॅरामेडिको असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी, सभासद डॉक्टरांचा सहभागी होते.

आपत्कालीन वैद्यकीय पथकाजवळ सावली केअर सेंटर, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल यांच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत्या. विसर्जन मिरवणुकीवेळी सलग चोवीस तास जिवाची पर्वा न करता अहोरात्र दक्ष राहून चोख सेवा बजावणाऱ्या महापालिका अग्निशमन दलातील जवानांना भोजन जाग्यावर पुरविण्याचे सेवाभावी कार्य कळंबा येथील बापूरामनगरातील कांदळकर कुटुंबीयांनी केले.

शहराची टेहळणीमिरवणुकीदरम्यान संपूर्ण शहरावर टेहळणी करण्यात येत होती. पोलीस मनोऱ्यावरून दुर्बिणीद्वारे टेहळणी केली जात होती. शहरात विविध ठिकाणी बसविलेल्या १६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिळणाऱ्या चलत्चित्रांवरही पोलिसांची बारीक नजर होती.

 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनkolhapurकोल्हापूर