शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

निट्टूरचे गणेश विद्यामंदिर : ई-लर्निंगचा आदर्श वस्तुपाठ

By admin | Updated: July 9, 2015 00:22 IST

-गुणवंत शाळा

चंदगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक. ग्रामीण व कोकणसदृश येथील भौगोलिक व नैसर्गिक स्थिती आहे. कुटुंबं तशी शेती व दुग्ध व्यवसायावर गुजराण करणारी. मात्र, श्री गणेश विद्यामंदिर निट्टूर गावची शाळा ही अद्ययावत ज्ञान, नावीन्यपूर्ण उपक्रम व आधुनिक तंत्रसाधनाने अध्यापन करणारी आहे. निट्टूरची ही शाळा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील ई- लर्निंगचे पहिले विद्यामंदिर आहे. लोकसहभागातून सुरू झालेली आणि सर्व गावाने उचलून धरलेली ही सुविधा आहे.निट्टूर गावची लोकसंख्या दोन हजार पाचशेच्या आसपास आहे. श्री गणेश विद्यामंदिरमध्ये पहिली ते चौथीचे वर्ग असून, शिक्षक संख्या पाच आहे. येथे राजगोळे हे मुख्याध्यापक असून, त्यांचे प्रशासन उत्कृष्ट आहे. १६ सदस्यांची शाळा व्यवस्थापन समिती सक्रिय करण्यात, चंदगड पंचायत समितीचे लक्ष वेधण्यास, महिला सरपंचाचे व सदस्यांचे सहकार्य मिळविण्यात राजगोळे वाकबगार आहेत. शिक्षक कुंभार, लोहार, श्रीमती सरवणकर, सौ. नार्वेकर आणि ‘टीम वर्कचे फलित’ म्हणजे गुणवत्तेची हमी हे सिद्ध झाले आहे.‘ई-लर्निंगचा काय फायदा झाला, असे विचारले असता राजगोळे म्हणाले, मल्टीमीडिया प्रभावामुळे मुलांच्या शिकण्यात रंजकता आली. मुलांसाठी स्वयंअध्ययनासाठी अत्यंत सुलभ शब्द व वाक्यरचना करता आली. मुलांसाठी मुलांच्या मदतीने ४०० हून अधिक ई-बुक्सचे ई -ग्रंथालय, शिष्यवृत्ती व सामान्यज्ञानसारख्या सराव चाचण्यांचे पेपरलेस आणि भरपूर सराव सुविधा देण्यात येत आहे. परिपाठात हायटेक वापरून विशेषत: बातम्यांचे प्रेझेंटेशन, सुविचार, प्रबोधनपर माहिती, दिनविशेष, इ. आॅफलाईन आणि आॅनलाईनद्वारा खूप माहिती व डाटा याचा अध्यापनात उपयोग होतो. हे सगळं सांगत ते प्रत्यक्षात दाखवतही होते. मुलं स्वत: वापर करताना पाहिले. आजूबाजूच्या शाळा व शिक्षक ही सुविधा पाहून जात असून, त्यापासून प्रेरणाही घेत आहेत. शाळेतील सर्व मुलांच्या वाढदिवसाचा महिनानिहाय आलेख, तक्ता व तोही परमनंट लॅमिनेशन करून लावलेला. आलेख घटकांचे अध्यापन या प्रकारे. फोटोसह आलेख टांगलेला मुलांना आगळा-वेगळा आनंद देणारा, प्रकट वाचनावर भर, लेखनाचा सराव, स्वाध्याय हस्तपुस्तिकेचा वापर, गणिती खेळ, भाषाकौशल्य वाढविण्याचे उपक्रम, कृतिशील अध्यापन, स्वयंअध्ययनावर भर, गट पद्धती, कुल तयार करून अध्ययनास प्रेरणा हे सगळं नियोजन पद्धतीने काटेकोरपणे केले जात आहे. ज्ञान, प्रगती आणि विकास हे शाळेचे तीन पैलू आणि त्या पैलूंना झळाळी देणारे, गुणवत्तेसह पुढे नेणारे, कर्तव्यनिष्ट व कमिटेड शिक्षक.लोकसहभागातून दोन लाख ६० हजार एवढी रक्कम उभी राहण्यात मिळवलेले यश. खरोखरच ज्ञानरचनावाद प्रत्यक्षात अध्यापन व अध्ययन आणणारे हे शिक्षक. कृतिशील अध्यापनाचा ध्यास व त्यासाठी प्रयत्न करणारे खास असे हे गुरूजन, ई-लर्निंग माध्यम तर अध्यापनासाठी नेहमीच वापरतात. मुलंही ते तंत्र वापरण्यास सरावले व सरसावलेले. खरोखरच श्री गणेश विद्यामंदिर निट्टूर प्राथमिक शाळा आय.एस.ओ. मार्क लाभण्यायोग्यच!- डॉ. लीला पाटील