शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Ganesh Chaturthi 2018 : ऐतिहासिक न्यू पॅलेसवर श्रीगणराया विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:27 IST

गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

ठळक मुद्देऐतिहासिक न्यू पॅलेसवर श्रीगणराया विराजमानशाही घराण्याच्या गणेशाचे पालखीतून आगमन, शाहू महाराजांनी केली पूजा

कोल्हापूर : गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

ऐतिहासिक पापाची तिकटी येथील कुंभारवाड्यातून न्यू राजवाड्यापर्यंत वाजत गाजत पालखीतून श्री गणेशाचे मिरवणुकीने आगमन झाले. घोडा, पालखी, वाजंत्रीसह पारंपारिक वाद्यांच्या गजरात राजवाड्याच्या प्रवेशद्वारात आणलेल्या गणेशाची प्रथम आरती करण्यात आली.

प्रारंभी शाहू महाराज छत्रपती, याज्ञीसेनीराजे, खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे, यशराजे या शाही घराण्यातील सदस्यांनी गणेशाची आरती ओवाळून पूजा केली.राजउपाध्याय बाळकृष्ण दादर्णे यांनी अमर जुगर आणि सारंग दादर्णे या राजपुरोहितांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची षोडपोचारे पूजा केल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जुना राजवाडा येथील मंदिरातही बुधवारीच आणलेल्या श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर