शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कलशेट्टी यांच्या बदलीच्या निषेधार्थ गांधीच उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 19:18 IST

commissioner, transfar, muncipalcarporation, kolhapurnews महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी मंगळवारी दुपारी चक्क गांधीजीच रस्त्यावर उतरले. महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या भावना कळवल्या.गांधीच्या वेषातील हे अभिनव आंदोलन शहरवासीयासाठी कुतूहलाचा विषय ठरले.

ठळक मुद्देकलशेट्टी यांच्या बदलीच्या निषेधार्थ गांधीच उतरले रस्त्यावरगांधीच्या वेषातील अभिनव आंदोलन शहरवासीयासाठी कुतूहलाचा विषय

कोल्हापूर: महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी मंगळवारी दुपारी चक्क गांधीजीच रस्त्यावर उतरले. महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या भावना कळवल्या.गांधीच्या वेषातील हे अभिनव आंदोलन शहरवासीयासाठी कुतूहलाचा विषय ठरले.कलशेट्टी यांची अचानक बदली झाल्याने कोल्हापुरातील सर्वसामान्य माणूस हळहळला आहे. बदली करण्याच्या प्रवृत्तीविरोधात तो रोज वेगवेगळ्या प्रकारात व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बदली रद्दच्या मागण्याही केल्या जात आहेत. मंगळवारची दुपारही त्याला अपवाद नव्हती.

गांधीजीचा वेश धारण करुन अंगभर पंचा आणि हातात काठी घेउन साहेबराव काशिद हा तरुण रस्त्यावरुन चालत निघाला. त्यांच्यासोबत शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाचे प्रवीण पवार,आचारी संघटनेचे संदीप लाड, मुस्लीम समाजाचे आश्पाक बागवान, घोडा संघटनेचे जावेद बागवान यांनीही सहभाग घेतला.महापूर आणि कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावर उतरुन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कलशेट्टी यांना आयुक्त म्हणून पुन्हा आणा असे फलक हातात घेउन त्यांनी आयुक्तांची बदली रद्द करा अशा घोषणाही दिल्या. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेअन मागणीचे निवेदन दिले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्तTransferबदली