शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

यड्रावच्या सान्वी, गणेशला लवकरच मिळणार पालकत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:20 IST

यड्राव : येथील खुनाच्या घटनेत आईचा मृत्यू, तर वडील आरोपी असल्याने पोलिसांच्या ताब्यात अशा विचित्र परिस्थितीत सापडलेली सान्वी जगताप व गणेश जगताप या बहीण-भावाला अब्दुललाट येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या बालोद्यान संस्थेने पालकत्व देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत या मुलांच्या नातेवाइकांकडून येणारा सकारात्मक प्रतिसाद या दोघांचे भवितव्य ठरविणार आहे. संस्थेला नातेवाइकांच्या ...

ठळक मुद्देअब्दुललाटचे बालोद्यान इच्छुक : नातेवाइकांच्या निर्णयाची प्रतीक्षा

यड्राव : येथील खुनाच्या घटनेत आईचा मृत्यू, तर वडील आरोपी असल्याने पोलिसांच्या ताब्यात अशा विचित्र परिस्थितीत सापडलेली सान्वी जगताप व गणेश जगताप या बहीण-भावाला अब्दुललाट येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या बालोद्यान संस्थेने पालकत्व देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत या मुलांच्या नातेवाइकांकडून येणारा सकारात्मक प्रतिसाद या दोघांचे भवितव्य ठरविणार आहे. संस्थेला नातेवाइकांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

यड्राव येथे शनिवारी घडलेल्या हत्याकांडातील प्रदीप जगताप याने पत्नी, सासू, मेहुणी व मेहुणा यांच्यावर हल्ला करून खून केला. या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. मृत झालेल्या रूपाली जगताप हिची सान्वी ही अकरा वर्षांची मुलगी, तर गणेश हा चार वर्षांचा मुलगा आहे. आई या दुर्घटनेत मृत, तर वडील हत्यारा असल्याने पोलिसांच्या ताब्यात, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याने या चिमुकल्यांचे भवितव्य काय? असा यक्ष प्रश्न पडला होता.

सामाजिक बांधीलकी जपणारी समाजात अनेक मंडळी व संस्था आहेत. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनी संस्थने २००९ मध्ये बालोद्यान ही संस्था सुरू केली आहे. समाजातील अनाथ, निराधार मुलांना आधार देऊन त्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभारी देण्याचा प्रयत्न ही संस्था करते. या संस्थेने मातृत्वापासून पोरक्या झालेल्या व पितृत्वापासून दुरावलेल्या सान्वी व गणेश जगताप या दोघांना पालकत्व देण्याची मानसिकता त्यांच्या नातेवाइकांसमोर व्यक्त केली आहे.संस्थेचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे यांनी प्रदीप जगताप याच्या नातेवाइकांशी संपर्क साधून सान्वी व गणेश यांना दत्तक घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट करून दोघेही स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता येईपर्यंत त्यांचे पालन पोषण व संगोपन करण्याची जबाबदारी घेणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. याबाबत जगताप यांच्या नातेवाइकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर दोन चिमुकल्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे.

सान्वी आणि गणेश यांचे शिक्षण, संस्कार, आरोग्य, उद्योग किंवा नोकरी लागेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेणार आहे. नातेवाइकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे महत्त्वाचे आहे. संस्थेमध्ये सध्या बालवाडी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयापर्यंतची मुले आहेत.- कुलभूषण बिरनाळे, अध्यक्ष, बालोद्यान संस्था अब्दुललाट

टॅग्स :MurderखूनSocialसामाजिक