शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा तालुका दुर्लक्षितच

By admin | Updated: December 30, 2014 23:42 IST

लोकप्रतिनिधींची अनास्था : पर्यटनवाढीसाठी सुविधांची गरज

चंद्रकांत पाटील - गगनबावडा -निसर्गसौंदर्याने बहरलेल्या, सह्याद्रीच्या कडेकपारीत वाड्यावस्तींसह विस्तारलेल्या गगनबावडा तालुक्यात विपुल जैवविविधता व बाराही महिने पर्यटकांना गारवा देणारे वातावरण, तसेच अनेक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तालुका पर्यटनाबाबत अन्य तालुक्यांच्या तुलनेत मागे राहिला आहे.गगनबावडा तालुका हा ४६ वाड्यावस्तींसह वसला असून, तालुक्यात अनेक पुरातन व ऐतिहासिक स्थळे आहेत. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून उदयास येत असलेल्या गगनबावडा येथे रिसॉर्टसह उन्हाळ्यात रानमेव्यांची सरबराई मन खेचून घेते. विविध जातींच्या वनप्राण्यांसह करूळ व भुईबावडा घाटातील कोकण पॉर्इंट, वळणाचे रस्ते, खोल दऱ्या पाहून पर्यटक मोहून जात आहेत.तालुक्यातील बोरबेट येथील विस्तीर्ण पठार, तेथील आकर्षक मोरजाई मंदिर, गुहा, नजीकचा कलकसांडे प्रकल्प, साखरी-तिसंगी येथील तामजाई मंदिर, तळगे बुद्रुक येथील वळताई देवीचे अधिष्ठान, मुटकेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिर व तेथील पुरातन वारुळ शासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होऊ लागले आहे. तसेच पळसंबे येथील पंत अमात्य बावडेकर सरकारांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या वाड्याची दुरवस्था झाली आहे. तालुक्यात लखमापूर-नरवेली येथील कुंभी मध्यम प्रकल्पाबरोबरच अणदूर, कोदे, वेसरफ येथील तलाव पर्यटकांना आकर्षित करून घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील या सर्व स्थळांचा पर्यटन केंद्रात समावेश करणे गरजेचे आहे. कोकणशी थेट हृदयाचे नाते जोडणारा गगनबावडा हा केंद्रबिंदू आहे. येथे हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, त्यांच्या गरजा पुरविणारी सेवा येथे उपलब्ध नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र, त्यांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.गगनबावडा प. पू. गगनगिरी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला किल्ले गगनगड परिसराचा विकास अजून झालेला नाही. त्याचबरोबर रामेश्वर मंदिर, नागझरी तलाव, पळसंबे येथीलप्राचीन रामलिंग गुहा, तेथे बारमाही वाहणारा धबधबा व त्याच्या विकासाबाबत सर्वच पातळीवर उदासीनता राहिली आहे.