शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज साखर कारखाना स्वबळावर चालविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 16:06 IST

suger factory gadhinglaj kolhapur : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना स्वबळावर चालवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यस्थळी झाला.अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे होते.

ठळक मुद्देसंचालक मंडळाचा निर्णय थकहमी, अर्थसहाय्यासाठी मुश्रीफ,सतेज पाटील यांना भेटणार

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना स्वबळावर चालवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यस्थळी झाला.अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे होते.२०१३-१४ पासून आर्थिक अडचणींमुळे कारखाना १० वर्षांसाठी सहयोग तत्वावर'ब्रिस्क कंपनी'ला चालवायला देण्यात आला होता. परंतु,आठवड्यापूर्वी कंपनीने कराराची मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडला आहे.त्यामुळे पुढील नियोजनासंदर्भात विचारविनिमयासाठी संचालक मंडळाची बैठक झाली.सविस्तर चर्चेअंती कारखाना स्वबळावर चालवण्याचा निर्णय झाला.स्वबळावर कारखाना चालविण्यासाठी वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या थकहमीची गरज आहे. त्यामुळे थकहमीबरोबरच राज्य सहकारी बँक आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचे ठरले.चर्चेत अध्यक्ष अ‍ॅड. शिंदे, माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर, माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक अमर चव्हाण,सतीश पाटील, विद्याधर गुरबे आदींसह सर्व संचालकांनी भाग घेतला.संचालक दीपक जाधव, सदानंद हत्तरकी व क्रांतीदेवी कुराडे वगळता सर्व संचालक उपस्थित होते.३ वर्षांत कारखाना अडचणीतून बाहेर ..!कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० मे.टन, डिस्टिलरीची क्षमता ३५ हजार लिटर आणि इथेनॉल प्रकल्प सुरू केल्यास कारखाना येत्या ३ वर्षांत सर्व अडचणीतून बाहेर पडेल,असा विश्वास उपाध्यक्ष डॉ.संग्रामसिंह नलवडे यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर