शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

गडहिंग्लज साखर कारखाना सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST

* 'ब्रिस्क'चे म्हणणे : कंपनीचा खर्च देण्याची अट निविदेत समाविष्ट करा गडहिंग्लज : शासनाच्या आदेशाप्रमाणे 'ब्रिस्क' कंपनीने आर्थिक अडचणीतील ...

* 'ब्रिस्क'चे म्हणणे : कंपनीचा खर्च देण्याची अट निविदेत समाविष्ट करा

गडहिंग्लज :

शासनाच्या आदेशाप्रमाणे 'ब्रिस्क' कंपनीने आर्थिक अडचणीतील गडहिंग्लज साखर कारखाना ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी चालवायला घेतला होता. परंतु, कराराची मुदत अद्याप दोन वर्षे बाकी असली तरी यापुढे कंपनीला कारखाना चालविणे शक्य नाही. त्यामुळे पुढील हंगामाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी कारखान्याचा ताबा तत्काळ संचालक मंडळाकडे द्यावा आणि दबावापोटी व करारापूर्वी माहिती न दिल्यामुळे अत्यावश्यक बाबींसाठी केलेला खर्च मुदतीत कंपनीला देणे निविदेत बंधनकारक करावे, अशी विनंती 'ब्रिस्क'ने पत्रात केली आहे.

पत्रात म्हटले आहे, कंपनीने उत्पादन केलेली ५,८८,०६५ क्विंटल साखर कारखान्याच्या गोदामात आणि रेक्टिफाईड स्पिरीट व मोलॅसिस टाक्यांमध्ये शिल्लक आहे. विक्री होईपर्यंत हा साठा कंपनीकडे राहिल, तो बाहेर नेताना आडकाठी करता येणार नाही. शेतकºयांची एफआरपी, तोडणी-वाहतूक बीले, डिपॉझीट, कमिशन इत्यादी तसेच कारखाना ताब्यात देईपर्यंतचा पगार, महागाई फरक, निवृत्त कामगारांची देणी कराराप्रमाणे पूर्ण भागविण्याची हमी कंपनी घेत आहे.

कंपनीची जी येणे रक्कम शासन निश्चित करणार आहे किंवा कारखाना कंपनीकडून जी येणे रक्कम काढणार आहे. त्यासाठी दोन आठवड्याची मुदत देऊन कंपनी आणि कारखान्याला लेखी म्हणणे देण्यास सांगावे. दोघांच्या पत्राप्रमाणे येणी-देणी अंतिम करून कारखाना चालविण्यासाठी निविदा काढताना कारखाना चालवायला पुढे येणाऱ्याला किंवा स्व:बळावर चालवायला घेणाऱ्या संचालक मंडळाला ही रक्कम मुदतीत देणे बंधनकारक करावे, अशी विनंती कंपनीने केली आहे.

--------------------------------

२) कंपनी जाणारच असल्यास नाईलाज आहे

कारखान्याचे म्हणणे : सर्व देणी देवून कारखाना सोडावा

गडहिंग्लज :

आजअखेर कंपनी व कारखाना प्रशासनात कोणताही वाद अगर मतभेद झालेले नाहीत. त्यामुळे कंपनीने मध्येच सोडून जावे असे कारखान्याचे म्हणणे नाही. कंपनीचे नुकसान व्हावे व कारखाना सोडून जावे, असे कोणतेही चुकीचे वर्तन संचालक मंडळ किंवा कामगारांकडून झालेले नाही. तरीदेखील कंपनीचा कारखाना सोडण्याचा आग्रह असेल तर नाईलाज आहे. शेतकरी, कामगार आणि कारखान्याची सर्व देणी देऊन कंपनीने कारखाना सोडावा, असे लेखी म्हणणे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी दिले आहे.

पत्रात म्हटले आहे, कंपनीकडून कारखान्याला ४३ कोटीपैकी ३ कोटी २६ लाख, कार्यालयीन खर्चासाठीचे १ कोटी २५ लाख ५० हजार येणे आहे. कामगार सोसायटीचे २ कोटी, पहिल्या हंगामात घेतलेल्या कारखान्याच्या स्टोअरमधील साहित्य व ऊसबिलातील कपातीचे मिळून ६३ लाख येणी आहे.

सभासदांना दिलेल्या सवलतीच्या साखरेमुळे १३ कोटी २८ लाखाचे नुकसान झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु, तत्कालीन संचालक मंडळ व कंपनीत झालेल्या चर्चेनुसार अन्य कारखान्यांप्रमाणेच कंपनीने ही साखर दिली आहे. त्या साखरेच्या दरातील फरकाची रक्कम देण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. २०१३ पूर्वी प्रदूषण मंडळाची क्लोझर नोटीस कारखान्याला कधीही आलेली नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी व मशीनरीच्या आधुनिकीकरणाची माहिती कंपनीने कारखान्याला दिलेली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या ८ कोटी ८२ लाख व मशिनरी आधुनिकीकरणाच्या ९ कोटी ३७ लाखाच्या खर्चाला कारखाना जबाबदार नाही. करारावेळी बाजूला काढून ठेवलेल्या १७ कोटी ९३ लाखाच्या ड्यूडीलीजन्स रक्कमेतील युनियन बँकेचे बेसलडोस कर्ज २ कोटी ४१ लाख व स्टेट बँकेचे ५ कोटी ५० लाख मिळून ७ कोटी ९१ लाख कर्जाची परतफेड केल्याबद्दल २ वर्षे मुदत वाढवून देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय झाला आहे. परंतु, त्याबाबत कंपनीचे उत्तर आलेले नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, बाळकृष्ण परीट, 'ब्रिस्क' कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड, सरव्यवस्थापक वसंत गुजर, प्रशासन अधिकारी श्याम हरळीकर, कारखान्याचे वित्त व्यवस्थापक बापू रेडेकर आदी उपस्थित होते.

-----------------------------------------

*

चौकट

२०१३-१४ पासून गडहिंग्लज साखर कारखाना 'ब्रिस्क' कंपनीला सहयोग तत्वावर १० वर्षांसाठी चालवायला देण्यात आला आहे. परंतु, पोषक वातावरण नसल्याच्या कारणावरून कंपनीने मुदत संपण्यापूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात सहकार खात्याचे अप्पर सचिव अरविंदकुमार यांच्यासमोर बुधवारी (३१) दुसरी सुनावणी झाली. यावेळी कंपनी व कारखान्याने आपली बाजू लेखी पत्राद्वारे मांडली.

--------------------------------

* गडहिंग्लज कारखाना फोटो : ३१०३२०२१-गड-०५