शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

गडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 17:24 IST

Panchyatsamiti gadhingalj Kolhpaur- केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीला दुसरा क्रमांक मिळविला.

ठळक मुद्देगडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली२५ लाखांचे बक्षीस : केंद्राकडून पं. दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार

गडहिंग्लज :केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीला दुसरा क्रमांक मिळविला.जानेवारी, २०२१ मध्ये राज्यस्तरावरील कोकण विभागीय समितीने गडहिंग्लज पंचायत समितीच्या कामांची पाहणी केली होती. या यशाबद्दल गडहिंग्लज पंचायत समितीला २५ लाखाचे बक्षीस आणि सन्मानपत्र देवून पंडीत दीनदयाळ उपाध्याय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजना, समाजकल्याण, स्वच्छता अभियान, आरोग्य विभागाकडील योजना, राष्ट्रीय पेयजल योजनांसह सर्व विभागातर्फे राबविलेल्या योजना व कामांची पाहणी करून समितीने मूल्यांकन केले होते. यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यस्तरावरील यशवंत पंचायत राज स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

त्यापाठोपाठ केंद्राच्या पुरस्कारामुळे पंचायत समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. याकामी सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इराप्पा हसुरी यांच्यासह सर्व सदस्य, गटविकास अधिकारी शरद मगर, खातेप्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

५ वर्षात दुसऱ्यांदा यश..!यापूर्वी २०१४-१५ मध्येही या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत समितीला राज्य पातळीवर पहिल्या क्रमांक मिळाला होता. पाच वर्षानंतर राज्यपातळीवरील या स्पर्धेतील यशाची पुनरावृत्ती झाली आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सदस्यांचा सक्रीय सहभागामुळे शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी सहजपणे करता आली. त्याचे सादरीकरणही उत्तमरित्या केले. सर्वांचे सहकार्य व सक्रिय सहभागामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.- शरद मगर,गटविकास अधिकारी, गडहिंग्लज पंचायत समिती.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीkolhapurकोल्हापूर