शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलांच्या वसुलीत गडहिंग्लज विभाग अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

राम मगदूम। गडहिंग्लज : मार्च २०२१ अखेर २६ कोटी १३ लाखांचे उद्दिष्ट असतानाही तब्बल ३४ कोटी ३ लाखांची ...

राम मगदूम। गडहिंग्लज :

मार्च २०२१ अखेर २६ कोटी १३ लाखांचे उद्दिष्ट असतानाही तब्बल ३४ कोटी ३ लाखांची वीज बिल वसुली करून ‘महावितरण’च्या गडहिंग्लज विभागाने कोल्हापूर परिमंडळात प्रथम क्रमांक पटकाविला. एकूण १३० टक्के इतकी वसुली झाली असून गडहिंग्लज उपविभागातील ५१ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.

गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाची महामारी सुरू झाली. ती रोखण्यासाठी लॉकडाऊनसह अनेक कडक नियमांची अंमलबजावणी शासनाला करावी लागली. तत्पूर्वी, अनावृष्टी व अतिवृष्टीनंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शेतीपंपासह घरगुती, व्यापारी, औद्योगिक व अन्य ग्राहकांकडील वीज बिलांची अब्जावधींची वसुली थकली.

शेतीच्या कर्जाप्रमाणेच वीज बिलांचीदेखील माफी होईल म्हणून अनेक ग्राहकांनी,श तर रोजीरोटी गेल्यामुळे जगणेदेखील मुश्कील झालेल्या काहींनी वीज बिले भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे महावितरण कंपनी मोठ्या आर्थिक अडचणीत आली. अशा कठीण परिस्थितीत थकीत वीज बिलांची वसुली करणे हे आव्हानात्मक काम होते.

परंतु, गडहिंग्लज उपविभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले. त्याची नोंद ‘महावितरण’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आवर्जून घेतली. त्यामुळे वीज बिल वसुलीचा गडहिंग्लज पॅटर्न राज्यभर चर्चेत आला आहे.

उपविभागनिहाय वसुलीची टक्केवारी, उद्दिष्ट व प्रत्यक्ष वसुली कंसात कोटीत - गडहिंग्लज विभाग - १३० टक्के, २६.१३ (३४.०३), इचलकरंजी विभाग - ८२ टक्के, ९५.४१ (७८.३८), जयसिंगपूर विभाग - १०३ टक्के, ६८.४५ (७०.१९),

कोल्हापूर ग्रामीण १ - १०७ टक्के, ५८.१५ (६२.००), कोल्हापूर ग्रामीण २ - ९१ टक्के, ७७.४० (७०.४४), कोल्हापूर शहर - ८८ टक्के, ६४.२३ (५६.६३), इस्लामपूर विभाग - ११४ टक्के, ३९.७९ (४५.५४), कवठेमहांकाळ - ७३ टक्के, २६.८९ (१९.५७), सांगली ग्रामीण - ९० टक्के, ३६.६८ (३३.१५), सांगली शहर - ७९ टक्के, ५३.४५ (४२.३९), विटा विभाग -७७ टक्के, ७९.८३ (३८.१४).

----------------------------------

* 'लोकमत'चे आभार..!

'लोकमत'ने सुरुवातीपासूनच घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे थकीत वीज बिल वसुलीसाठी मोठी मदत झाली. दुर्गम व डोंगरी प्रदेश असलेल्या गडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागात हे आव्हानात्मक काम होते; परंतु सरपंचापासून आमदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि जनमित्र ते उपकार्यकारी अभियंत्यांपर्यंत सर्वांनी अंत:करणापासून प्रयत्न केले. त्याला वीज ग्राहकांनीदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, म्हणूनच हे शक्य झाले. याकामी सहकार्य केलेल्या सर्वांचे आणि विशेषत: 'लोकमत'चे मन:पूर्वक आभार.

- संजय पोवार, प्रभारी कार्यकारी अभियंता, गडहिंग्लज विभाग.

--------------------

या उपक्रमांमुळे मिळाले यश

* कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन.

* थकबाकीमुक्त शेतकरी महिलांचा सन्मान.

* महावितरण आपल्या ‘शिवारी' योजनेची प्रभावी अंमलबजावणी.

* महिला कर्मचाऱ्यांच्या 'दामिनी' पथकाद्वारे वसुली मोहीम.

* आठवडा बाजारात स्टॉल मांडून प्रबोधन.

--------------------

फोटो ओळी : वीज बिल वसुलीमध्ये कोल्हापूर परिमंडळाने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी खास गडहिंग्लजला येऊन प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.

क्रमांक : २३०४२०२१-गड-०९