गडहिंग्लज : मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत अंगावर कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या नांगनूर येथील मयतांच्या वारसांना निगवे खालसा येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांतर्फे ५ हजारांची मदत देण्यात आली.
नांगनूर येथील आजी-माजी सैनिकांनीही वर्गणीतून जीवनावश्यक वस्तू दिल्या. यावेळी कुमार पाटील, रमेश देसाई, रामकृष्ण शेंडे, प्रभाकर घोरपडे, उदय कासारकर, बापू पाटील, आप्पा रावण, मनोहर नाईक, कुमार नार्वेकर, अरूण कांबळे, आदी उपस्थित होते.
----------------------
२) नांगनूरच्या आपद्ग्रस्तांना ‘मानवाधार’कडून मदत
गडहिंग्लज : मानवाधार बहुउद्देशीय मागासवर्गीय सेवाभावी संस्थेतर्फे नांगनूर येथील आपद्ग्रस्तांना मदत करण्यात आली. मुगळी येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या निराधार कुटुंबातील मुलांना अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य व ब्लँकेट्स देण्यात आली.
‘मानवाधार’चे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी निराधार तीनही मुलांच्या एका वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली. यावेळी अजित दावणे, कल्पना कांबळे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------
३) पुस्तक बांधणी कामगाराच्या मदतीसाठी धावले मुद्रक बंधू
गडहिंग्लज : येथील पुस्तक बांधणी कामगार वसंत नाथबुवा यांचा मुलगा वैभव याच्या वैद्यकीय उपचारासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील मुद्रण व्यावसायिकांनी वर्गणी काढून ३६ हजार ५०० रूपयांची मदत केली.
सुनील जठार यांच्या हस्ते वसंत नाथबुवा यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ मुद्रक पांडुरंग इंगळे, मनोहर कळेकर, दीपक कुलकर्णी, राम बागडी, अर्जुन पाटील, आदी उपस्थित होते.
--------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सुनील जठार यांच्या हस्ते वसंत नाथबुवा यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी शहरातील मुद्रण व्यावसायिक उपस्थित होते.
क्रमांक : १६०६२०२१-गड-०१