शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

गडहिंग्लज, आजऱ्याची शकले पडून बनला ‘चंदगड’

By admin | Updated: September 15, 2014 00:50 IST

मतदारसंघाबरोबर बदलले राजकारण : आजरा तालुक्याला आमदारपदाची संधी आतापर्यंत एकदाच

राम मगदूम - गडहिंग्लज -महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी इलाख्यातील बेळगाव जिल्ह्यात चंदगड व आजरा या दोन महालांचा मिळून चंदगड विधानसभा मतदारसंघ होता. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आजरा व मलिग्रे या दोन जिल्हा परिषद मतदारसंघांसह चंदगड तालुका मिळून ‘चंदगड-आजरा विधानसभा मतदारसंघ’, तर गडहिंग्लज तालुक्यासह उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ मिळून गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघ झाला. त्यानंतर अलीकडील पुनर्रचनेत आजऱ्याबरोबरच गडहिंग्लज तालुक्याची शकले होऊन नवीन चंदगड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. चंदगड, गडहिंग्लज मतदारसंघाच्या बदलत्या रचनेबरोबरच राजकीय समीकरणेही बदलत गेली आणि प्रारंभी शे.का.प.च्या वर्चस्वाखाली असणाऱ्या या मतदारसंघावर एक-दोन अपवाद वगळता काँग्रेसने अधिराज्य केले. त्यानंतर येथील जनतेने ‘राष्ट्रवादी’ला देखील साथ दिली. १९५२ मध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत ‘शेकाप’चे तत्कालीन नेते अ‍ॅड. व्ही. एस. पाटील हे ‘चंदगड महाला’तून मुंबई इलाख्यावर निवडून गेले. दरम्यान, त्यांना म्हैसूर प्रांताच्या विधानसभेवर देखील प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीतही शे.का.प.च्या नरसिंग भुजंगराव पाटील यांना संधी मिळाली. ‘चंदगड’मध्ये सलग दोनवेळा ‘शेकाप’ला संधी मिळाली असतानाही शेजारील ‘गडहिंग्लज’मध्ये पहिल्यावेळी रत्नाप्पा कुंभार गटाचे कॉँग्रेस नेते म. दु. श्रेष्ठी आमदार झाल्यानंतर ‘शेकाप’च्या भाई नार्वेकरांनी आमदारकी पटकावली. १९६२ मध्ये व्ही. के. चव्हाण-पाटील यांनी चंदगड-आजऱ्यातून, तर आप्पासाहेब नलवडे यांनी ‘गडहिंग्लज’मधून विधानसभेत कॉँग्रेसचा झेंडा फडकावला. त्यानंतरच्या १९६७ च्या निवडणुकीतही व्ही. के. यांनी बाजी मारली; पण गडहिंग्लजमध्ये ‘शेकाप’च्या भाई कोलेकरांनी नलवडेंचा पाडाव केला. १९७२ मध्ये बी. एस. पाटील यांनी गडहिंग्लजची, तर वसंतराव देसाई यांनी चंदगड-आजऱ्याची आमदारकी कॉँग्रेसकडे खेचून आणली. वसंतरावांच्या रूपाने आमदारकीची संधी आजरेकरांना पहिल्यांदाच मिळाली. त्यानंतर आजअखेर आजऱ्याचा आमदार झाला नाही. १९८० व १९८५च्या दोन्ही निवडणुकीत चंदगडमधून पुन्हा व्ही. कें.नीच बाजी मारली. त्यानंतर त्यांनी भाचे नरसिंगराव पाटील यांना ‘चाल’ दिली. आजरेकरांनी मामा-भाचे दोघांनाही साथ दिली. याउलट ‘अजातशत्रू’ असूनदेखील घाळींना गडहिंग्लजमध्ये आमदारकीची हॅट्ट्रिक करता आली नाही. कॉँग्रेसमधील दुफळीचा फायदा उठवून जनता दलाच्या अ‍ॅड. श्रीपतराव शिंदेंनी सलग दोनदा आमदारकी भूषविली. दरम्यान, चंदगडमध्ये व्यक्तीकेंद्रित गटातटाचे राजकारण सुरू झाले. त्यामुळेच शिंदे यांनीच केवळ जुन्या गडहिंग्लज मतदारसंघात चढत्या मताधिक्क्याने हॅट्ट्रिक नोंदविली.