कडगाव-गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत अंकुश पाटील याने ‘पोल्ट्री व्हॅक्सिनचे प्रात्यक्षिक’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सदानंद इंदूलकर, शिवतेज घाटगे, दिलीप पाटील, अनिकेत चौगुले, प्राचार्य एम.डी. माळी, प्रा. बी.बी. कडपे आदी उपस्थित होते.
------------------------
२) जखेवाडीमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कडगाव-गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत किशोर हुवाप्पा पाटील याने ‘एकात्मिक तण व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्याला प्राचार्य एम.डी. माळी, वाय.ए. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------------
३) गडहिंग्लजला उद्या ‘रत्नवेल’चे प्रकाशन
गडहिंग्लज : गडहिंग्लजचे माजी आमदार डॉ. एस.एस. घाळी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांच्या डॉ. सरोज बीडकरलिखित ‘रत्नवेल’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शनिवारी (२१) होत आहे. ग्रामविकास त्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशन होईल. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे संचालक विनय पाटील, डॉ. सतीश घाळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
------------------------
४) नंदनवाडमध्ये रक्तदान शिबिर
गडहिंग्लज : नंदनवाड (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दीपक पुजारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. राज्य मजूर संघाचे संचालक उदय जोशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, बाजार समिती अध्यक्ष अभय देसाई, माजी जि.प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, अंकुश रणदिवे, ज्ञानप्रकाश रेडेकर, सागर झळके, श्रीमंत पुजारी, बसवराज पुजारी, प्रसाद जोशी, सुशांत नौकुडकर आदींची उपस्थिती होती.
--------------------------
५) गिजवणे येथे अंगणवाडी बांधकामास प्रारंभ
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील यांच्या हस्ते अंगणवाडी इमारत बांधकामाचे उद्घाटन झाले. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी क्रमांक २१६ च्या बांधकामास निधी मंजूर झाला आहे.
यावेळी सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच नितीन पाटील, लक्ष्मण शिंदे, भूषण गायकवाड, प्रशांत कुंभार, शिल्पाताई पाटील, वर्षा पाटील, शशिकला पोडजाळे, अन्नपूर्णा नाईक, ग्रामसेवक डी.बी. कुंभार, रमेश पाटील, संतोष चव्हाण आदींची उपस्थिती होेती.