कोवाड येथे आजपासून
तीन दिवस जनता कर्फ्यू
कोवाड : कोवाड (ता. चंदगड) येथील कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व प्रशासनाने कोवाडला आजपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.लोकप्रतिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला.
रविवार ते मंगळवारअखेर दवाखाने व औषध दुकाने वगळता कोवाड बाजारपेठेसह, बँका, पतसंस्थांसह संपूर्ण गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त मेडिकल व दवाखाने सुरू राहतील.
बैठकीस सरपंच अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव,
चंदगडचे पोलीस निरीक्षक बी.आय. तळेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्ना चौगुले , कोवाड व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
-----
बातमी -२
गडहिंग्लज शहरात दर सोमवारी कोरडा दिवस
गडहिंग्लज : डेंग्यू साथीच्या
पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यापुढे दर सोमवारी गडहिंग्लज शहरात कोरडा दिवस पाळला जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण सापडत असल्याने
आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारपासून (१२ जुलै) त्याची सुरवात केली जाणार आहे. त्यासाठी दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
-
बातमी -३
गडहिंग्लज कारखान्यात संस्थापकांना अभिवादन
गडहिंग्लज :
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात संस्थापक अध्यक्ष दिवंगत पी. आर.ऊर्फ आप्पासाहेब नलवडे यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
हरळी(ता. गडहिंग्लज ) येथे कारखान्याच्या कार्यस्थळावर विद्यमान अध्यक्ष ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते स्व. नलवडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक अमर चव्हाण सचिव मनोहर मगदूम, चीफ इंजिनिअर प्रविण देसाई, प्रॉडक्शन मॅनेजर संभाजी सावंत, चिफ अकाउंटंट बापूसाहेब रेडेकर, सचिन पाटील - मुगळीकर यांच्यासह, सर्व खातेप्रमुख, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, हनिमनाळ येथे स्व. नलवडे यांच्या समाधीस्थळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी अनंत पाटील,अमोल देसाई, फत्तेसिंह नलवडे, विजयसिंह नलवडे, उत्तम देसाई, महादेव मांगले उपस्थित होते.
-
--
हरळी(ता.गडहिंग्लज )येथे गडहिंग्लज कारखान्याच्या कार्यस्थळावर संस्थापक
आप्पासाहेब नलवडे यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सभासद, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.