शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर!

By admin | Updated: April 27, 2015 00:50 IST

‘गोकुळ-के डीसीसी’मध्ये कुरघोडीचा परिणाम

राम मगदूम - गडहिंग्लज  ‘चंदगड’च्या आमदारकीसह गडहिंग्लज व आजरा पंचायत समित्यांवर निर्विवाद सत्ता आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची भक्कम फळी असतानाही गोकुळ व केडीसीसीच्या निवडणुकीत नेत्यांच्या ‘सोयी’च्या आणि कुरघोडीच्या व शहकाटशहच्या राजकारणाने गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष बॅकफूटवर गेला आहे. ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांत राष्ट्रवादीची भक्कम बांधणी केली. गडहिंग्लज व आजऱ्याची पंचायत समितीदेखील राष्ट्रवादीच्या ताब्यातच आहे. जिल्ह्याच्या तालुक्यांच्या तुलनेत येथे पक्ष प्रबळ असतानाही गोकुळ व केडीसीसीच्या निवडणुकीत या भागातील कार्यकर्त्यांवर अन्यायच झाला. केडीसीसीमध्ये गडहिंग्लज तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन संचालक होते. संतोष पाटील-कडलगेकर यांच्या रूपाने यंदा पक्षाला एकच उमेदवारी मिळाली. संध्यादेवींना मदत केलेल्या प्रकाशराव चव्हाण यांना डावलले. बंडखोरी केलेल्या अप्पी पाटील यांना ‘सत्तारूढ’ मधून उमेदवारी दिली. ‘आजरा’त अशोक चराटी यांना डावलून विरोधक जयवंत शिंपींना उमेदवारी देण्यात आली. ‘चंदगड’मध्ये विरोधकांनाच ताकद !आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले नरसिंगराव पाटील यांचे सुपुत्र राजेश आणि भरमूअण्णा पाटील यांचे सुपुत्र दीपक यांना चंदगड तालुक्यातून, तर भरमूअण्णांना पाठिंबा दिलेल्या सदानंद हत्तरकी यांना गडहिंग्लजमधून ‘गोकुळ’ची ‘सत्तारूढ’ची उमेदवारी दिली. मात्र, कागलमध्ये अमरीश घाटगे यांची उमेदवारी डावलण्याची ‘खेळी’ खेळलेल्या नेत्यांनी ‘चंदगड’मधील विरोधकांच्या उमेदवारीबद्दल ‘ब्र’देखील काढले नाही.