शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारावर गदा

By admin | Updated: November 11, 2015 23:41 IST

योजना, विकास निधी शासनाकडून बंद : १४ व्या वित्त आयोगाने सर्व निधी ग्रामपंचायतींकडे वर्ग

शिवाजी सावंत --गारगोटी--पंचायत समितीकडील सर्व योजना आणि विकास निधी शासनाने बंद केल्याने सदस्यांना आता खुर्चीत बसून नेमके काय करायचे? हेच समजेना. ग्रामपंचायतीनंतर जनमानसाचा पंचायत समितीशी संबंध येत असतो. अनेक प्रकारची छोटी-मोठी विकास कामे पं. स.मार्फत होत असत. इतर जिल्हा महामार्गाकरिता शासनाचा काही लाखांचा निधी हा पं. स.कडे जमा होत असे. गावातील गटर, अंतर्गत रस्ते, अंगणवाड्या, प्राथमिक शाळांच्या खोल्या, खडीकरण अशी कामे सत्ताधारी पं. समिती सदस्य आपआपल्या गणात करीत असे. त्यामुळे ग्रा.पं.नंतर पं. स. सदस्य हे आपल्या हक्काचे नेते वाटायचे. शिवाय शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना यामध्ये शेतीची अवजारे, विविध प्रकारची रासायनिक व सेंद्रीय खते, विविध प्रकारची औषधे, औषध फवारणी पंप, बी-बियाणे, औद्योगिक अवजारे खरेदीवर सवलती, ताडपत्री अशा विविध योजनांमुळे सर्वसामान्य कार्यकर्ते ते शेतकरी यांच्यापर्यंत सर्वांसाठी ते ‘मिनी आमदार’ वाटायचे. ग्रामसेवक, पं. स.चे सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन या खात्यांवर विशेष लक्ष देऊन सर्व विभागांकडून लोकहिताची काम करून घेणे अशी कामांची व्याप्ती होती; पण सध्या शासनाने १३ वा वित्त आयोग बंद करून सुधारित असा १४वा वित्त आयोग लागू केल्याने सर्व प्रकारचे निधी सरळ ग्रा.पं.च्या खात्यात जाणार आहेत. शेती विभागाकडील सर्व योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत दिल्या जाणार असल्याने तेथे कोणत्याही लोकप्रतिनिधींचा दुरान्वयीसुद्धा संबंध येणार नाही. कोणतीही कारवाई करणे, अथवा लाभधारकास लाभ मिळवून देण्यासाठी सदस्यांना अधिकार उरले नाहीत. भविष्यात सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार मिळणार नाहीत. एकवेळ ग्रा. पं. सदस्य होणे पसंत करतील, पण कोणीही पं. स. सदस्य होणार नाहीत. सध्याचे लोकप्रतिनिधी हे ग्रामपंचायत सदस्यपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करून पं. स., मग जि. प., त्यानंतर आमदार-खासदार होण्यापर्यंत मजल मारीत होते. पं. स.मध्ये काम करणाऱ्या सदस्यांचा तालुकास्तरावरील कार्यकर्ते, लोक यांच्याशी थेट संबंध येत असल्याने अनायासे त्यांची राजकीय कारकीर्द घडत जाते; पण शासनाने या साखळीवर हातोडा मारल्याने सदस्यांची कोंडी झाली आहे.याबाबत जिल्ह्यातील सर्व पं. स.चे सदस्य सामूहिकरीत्या राजीनामा देण्याच्या तयारीला लागले आहेत, असे एका सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.लाखमोलाची निवडणूक : अधिकाराचा अभावपंधरा हजार मतदार संख्येस एक पं. स. सदस्य. तो निवडून येण्यासाठी किमान साडेसहा हजार मतांची गरज असते. लाखो रुपये निवडणुकीसाठी खर्च. एवढे करून विकास निधी शून्य? कोणत्याही कर्मचारी अथवा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करता येत नाही. गटविकास अधिकारी सभेचे विषय सोईने प्रोसेडिंगवर घेणार, सदस्य काहीही करू शकत नाहीत. सध्या तर साधे ठेकेदारसुद्धा सभापतींचे फोन उचलत नाहीत. ही इतकी सर्व धिटाई येण्याचे एकमेव कारण म्हणजे निधीचा अभाव व कारवाईचा अधिकार नसणे.